गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा विभिन्न भूमिका साकारणा-या अशोक शिंदे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. १११ चित्रपटांचा टप्पा ओलांडलेल्या अशोक शिंदे यांनी आजतागायत विविध व्यक्तिरेखा रंगविल्या आहेत. १३०० भागांची मजल गाठलेल्या स्वप्नांच्या पलिकडे मालिकेत त्यांनी साकारलेली यशवंत पाटकर ही भूमिका घराघरांत पोहोचली. आता तब्बल १२ वर्षानंतर अशोक शिंदे पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर पदार्पण करताहेत अमोघ निर्मित प्रेम..प्रेम असतं या नाटकातून
आजच्या दैनंदिन जगण्यात नातेसंबंधात आलेला ताण तणाव, अविश्वास यावर भाष्य करत हे नाटक नात्यातील मैत्री शोधण्याचाही कानमंत्र देत. या नाटकात अशोक शिंदे हे प्रितम बांदेकरची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत असून मैथिली वारंग त्यांच्या पत्नीची भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबत पंकज– कामकर आणि गौरी देशपांडे यांच्याही भूमिका आहेत. प्रेक्षकांची रंगमंचावरून चटकन मिळणारी दाद अशोक यांना नेहमीच खूप महत्वाची वाटते. याकरिताच ते ब-याच मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर येत आहेत. येत्या २ जुलैला प्रेम.. प्रेम असत नाटकाचा मुंबईत शुभारंभ होत आहे.

Story img Loader