अभिनेता बॉबी देओलची मुख्य भूमिका असणारी वेबसीरिज ‘आश्रम ३’ अखेरीस प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या क्राईम थ्रीलर वेबसीरिजमध्ये बॉबी देओल साकारत असलेल्या बाबा निरालाची भूमिका तर प्रचंड गाजत आहे. शुक्रवारी म्हणजे ३ जून रोजी ‘आश्रम ३’ वेबसीरिज एम एक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली. आता या सीरिजच्या चौथ्या भागाची देखील घोषणा करण्यात आली आहे.

बॉबी देओलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘आश्रम ४’चा टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर वेबसीरिजच्या चौथ्या भागाची उत्सुकता वाढवणारा आहे. या एका मिनिटाच्या टीझरची सुरुवात बाबा निरालाच्या दमदार संवादाने होते. तसेच बाबा निराला आश्रममध्ये प्रवेश करताच ‘बाबा निराला की जय’ म्हणताना त्याचे भक्त दिसत आहेत.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

आणखी वाचा – जबरदस्त प्रमोशन, देवदर्शन करुनही ‘सम्राट पृथ्वीराज’ला थंड प्रतिसाद, अक्षय कुमारच्या हाती निराशा

या टीझरमध्ये पम्मी पहलवान म्हणजेच अभिनेत्री आदिती पोहनकर देखील दिसत आहे. आदितीच्या भूमिकेमुळे या टीझरची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे, आदितीने या सीरिजच्या आधीच्या भागांमध्ये देखील कमालीचं काम केलं होतं. ‘आश्रम ४’ टीझरमधील संवाद देखील विशेष लक्षवेधी आहेत. “बाबा अंतर्यामी हैं. आपकी मन की बात जानते है.” असं बॉबीने ‘आश्रम ४’चा टीझर शेअर करताना म्हटलं आहे.

आणखी वाचा – Photos : ‘पृथ्वीराज’च्या यशासाठी अक्षय कुमार करतोय देवदर्शन, गंगा आरतीदरम्यानचे फोटो व्हायरल

या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने आपापल्या वाट्याला आलेली भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. अभिनेत्री ईशा गुप्ताने देखील ‘आश्रम ३’मध्ये कमालीचं काम केलं आहे. बॉबी बऱ्याच काळापासून चंदेरी दुनियेपासून दूर होता. त्याच्याकडे फारसे चित्रपट किंवा इतर कोणतेच प्रोजेक्ट नव्हते. पण ‘आश्रम’ मधून कलाकार म्हणून आपण उत्तम आहोतच हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं.

Story img Loader