लगान- २३४ मिनिटे, स्वदेस- २१० मिनिटे, जोधा अकबर- २१४ मिनिटे, व्हॉट्स युअर राशी- २१३ मिनिटे, खेले हम जी जान से- १६८ मिनिटे.. ही आहे आशुतोष गोवारीकरची फिल्मोग्राफी आणि त्याच्या चित्रपटांचा कालावधी. पण आता आशुतोषने त्याच्या चित्रपटाच्या कालावधीत बरीच सुधारणा केल्याचे ऐकण्यात येतेयं.
हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांची प्रमुख भूमिका असलेला मोहेंजोदारो या चित्रपटाचा कालावधी केवळ १५० मिनिटे आहे. यात आम्ही ‘केवळ १५० मिनिटे’ शब्द याकरिता वापरलायं कारण गोवारीकरच्या आधीच्या चित्रपटांचा कालावधी पाहता त्याने या चित्रपटाचा कालावधी कमी करण्यात बरेचं कष्ट केल्याचे दिसते.
येत्या १२ ऑगस्टला मोहेंजोदारो चित्रपटगृहात दाखल होईल.

Story img Loader