बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा फक्त त्यांच्या चित्रपटांसाठीच नाही तर भाषा, कविता आणि उत्कृष्ट भाषणांसाठी ओळखले जातात. याशिवाय आशुतोष राणा सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. नुकताच त्यांनी महाशिवरात्रीच्या निमित्तानं फेसबुकवर ‘शिव तांडव’ व्हिडीओ शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता. चाहत्यांचीही या व्हिडीओला चांगली पसंती मिळाली होती. पण आता हा व्हिडीओ फेसबुकवरून डिलीट करण्यात आला आहे. यावर आशुतोष राणा यांनी एक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
आशुतोष राणा यांनी १ मार्चला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी ‘शिव तांडव स्तोत्र’चा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते शिव तांडव स्तोत्राचा पाठ करताना दिसले होते. महाशिवरात्रीच्या निमित्तानं शेअर करण्यात आलेला या व्हिडीओला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. काही तासांतच हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र आता हा व्हिडीओ फेसबुकवरून हटवण्यात आला आहे.
आणखी वाचा- अंकिता लोखंडे पुन्हा अडकली लग्नाच्या बेडीत! पूर्ण केली आईची अपुरी इच्छा
आशुतोष राणा यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मला आश्चर्य वाटतंय. काल महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी पोस्ट केली होती ज्यात शिव तांडव स्तोत्राचा व्हिडीओ होता. मात्र आता हा व्हिडीओ माझ्या टाइमलाइन वरून हटवण्यात आला आहे. असं का झालं मला समजत नाहीये. कारण मी तो व्हिडीओ डिलिट केलेला नाही. तो व्हिडीओ कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवणारा नव्हता. तसेच फेसबुकच्या नियमांचं उल्लंघनही या व्हिडीओमुळे झालं नव्हतं. या प्रकरणात फेसबुकनं लक्ष घालायला हवं.’
आणखी वाचा- Video- पूजा हेगडेसोबत डान्स करताना सलमानकडून झाली मोठी चूक, तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?
आशुतोष यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या चाहत्यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. आशुतोष राणा यांच्या कामाबद्दल बोलायचं तर वेब सीरिज ‘द ग्रेट इंडियन मर्डर’मध्ये दिसले होते. या वेब सीरिजचं दिग्दर्शन तिग्मांशू धुलियानं केलं होतं. या वेब सीरिजमधील आशुतोष राणा यांच्या कामाचं बरंच कौतुक झालं होतं. आगामी काळात आशुतोष राणा ‘शमशेरा’, ‘पठान’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.