चित्रपटाचा ट्रेलर हा सर्वात महत्त्वाचा असतो. ट्रेलर पाहून प्रेक्षक तो चित्रपट पाहायचा की नाही हे ठरवतात. म्हंटलं तर त्यात सगळं असायला हवं अन् म्हंटलं तर त्यात फारसं काही नसायलाही हवं, असा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर असेल तर चित्रपटाची चांगलीच हवा होते. आजवर आपण बरेच ट्रेलर्स पाहिले आहेत, पण आजवर कधी तुम्ही उलटा ट्रेलर पाहिला आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण नुकतंच ‘हिडिंबा’ या आगामी तेलुगू चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर उलटा म्हणजेच शेवटापासून सुरुवात अशा रीतीने सादर करण्यात आला आहे. हा ट्रेलर शेअर करतानाच ‘रिर्वस अॅक्शन ट्रेलर’ असं म्हणत प्रमोशन करण्यात आलं आहे.

आणखी वाचा : “शरद पवारांनी जातीचं राजकारण आणलं” राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची रोखठोक प्रतिक्रिया

सोशल मीडियावर या ट्रेलरची जबरदस्त चर्चा आहे. चित्रपटविश्वाच्या इतिहासात अद्याप अशी गोष्ट झालेली नसल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. असा उलटा ट्रेलर सादर करण्याचा हा बहुदा पहिलाच प्रयोग आहे आणि यात चित्रपटाच्या निर्मात्यांना चांगलंच यश मिळालं आहे. ट्रेलर उलटा दाखवला असला तरी प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात त्यांना यश मिळालं आहे.

चित्रपटात आश्विन बाबू आणि नंदिता स्वेता हे कलाकार हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनिल कन्नेगंटी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट येत्या २० जुलैला प्रदर्शित होणार आहे. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीदेखील या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत कौतुक केलं आहे.