आशिया चषक स्पर्धेमध्ये अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या भारत-पाकिस्तान सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. भारताला शेवटच्या तीन चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या या दमदार विजयानंतर सर्वत्र एकच जल्लोष पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या सामन्यादरम्यान मैदानातही एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी भारत-पाकिस्तान सामना पाहायला गेलेले अनेक प्रेक्षक हे बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकत असल्याचे पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिया चषक स्पर्धेतील बहुचर्चित अशा भारत-पाक सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने दणदणीत विजय मिळवला. दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना रंगला. यावेळी पुष्पा चित्रपटासाठी सुपरहिट ठरलेले ‘ऊ अंटावा’ हे गाणे मैदानात वाजल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या गाण्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चन याने एक ट्वीट केले आहे.
आणखी वाचा : India Beat Pakistan: भारताच्या दणदणीत विजयानंतर बॉलिवूडकरांनी केले टीम इंडियाचे कौतुक, रितेश देशमुख म्हणाला “पाकिस्तानचा संघही…”

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा हिच्यावर चित्रीत झालेले ‘ऊ अंटावा’ हे गाणे चांगलेच गाजले होते. या गाण्यावर अनेक नेटकऱ्यांनी रिल व्हिडीओही बनवले होते. या गाण्याची क्रेझ दुबईतही पाहायला मिळाली. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हे गाणे लावण्यात आले होते. यावेळी अभिषेक बच्चन याने एक ट्वीट केले होते. त्यात त्याने तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न विचारला होता. त्याचे हे ट्वीट काही क्षणात व्हायरल झाले.

भारताच्या आशिया चषक स्पर्धेतील विजयानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता रितेश देशमुख, कार्तिक आर्यन यांसह अर्जुन रामपाल या तिघांनीही भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे. तसेच अभिषेक बच्चन यानेही भारताच्या विजयानंतर ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Video : पथकाचा सराव बघणाऱ्या अमित ठाकरेंना मोह आवरेना, ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान आशिया चषक स्पर्धेतील बहुचर्चित अशा भारत-पाक सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य भारताने पाच गडी राखून गाठले. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात आपली भूमिका चोखपणे बजावली. त्याने गोलंदाजीमध्ये तीन गडी बाद करून पाकिस्तान संघाला रोखलं तर भारताची स्थिती बिकट झालेली असताना त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावत ३३ धावा केल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 india pakistan match pushpa movie oo antava song abhishek bachchan tweet nrp