रविवारी दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘आशिया कप टी२०’चा सामना पार पडला. यावेळी पुन्हा एकदा उर्वशी रौतेला स्टेडियममध्ये दिसली. या समान्यात भारताला पराभव पत्करावा लागला. क्रिकेटपटू ऋषभ पंत माजी कर्णधार विराट कोहलीसह चांगली भागीदारी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, मात्र ऋषभ पंत केवळ १४ धावा करून तंबूत परतला. एकीकडे लोक या पराभवासाठी सोशल मीडियावरून ऋषभ पंतवर जोरदार टीका करत आहेत तर दुसरीकडे उर्वशी रौतेला पुन्हा एकदा या कारणामुळे क्रिकेटप्रेमींच्या निशाण्यावर आली आहे. सोशल मीडियावरून लोक उर्वशीवर स्टेडियममध्ये बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचे गडी बाद झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला. त्याने १२ चेंडूत १४ धावा केल्या, ज्यात त्याने दोन चौकार मारले. हा सामना सांभळण्यासाठी ऋषभ पंत चांगली कामगिरी करेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. भारतीय खेळाडू मैदानात उतरतात तेव्हा अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवणारे चाहतेही विविध विचित्र युक्त्या वापरायला लागतात. आता असंच काहीसं घडलं आहे. हा सामना हरल्याचं आणि ऋषभच्या सुमार कामागिरीच खापर बरेच क्रिकेटप्रेमी उर्वशी रौतेलावर फोडताना दिसत आहेत.
आणखी वाचा- “आम्ही दुःखातून जातोय…” पूरस्थितीनंतर बॉलिवूडकरांच्या मौनावर पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत
उर्वशी रौतेलाचा स्टेडियममधील व्हिडीओ समोर येताच लोकांनी अशाच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरनं लिहिलं, “जर हिला क्रिकेट आवडत नव्हतं, मग ती सामना पाहायला का येते.” आणखी एकाने लिहिलं, “अलिकडेच ही म्हणाली होती की क्रिकेट पाहत नाही, खोटारडी कुठली” तर अन्य एकाने लिहिलं, “भारताला प्रोत्साहन द्यायला गेली होती की ऋषभला?” तर आणखी एकाने राग व्यक्त करताना लिहिलं, “फक्त हिच्यामुळेच आम्ही सामना हरलो.” याशिवाय काही युजर्सनी तर, ‘उर्वशी रौतेला ऋषभ पंतसाठी अपशकुनी आहे’ अशा आशयाच्याही कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा- ऋषभ पंत, उर्वशी रौतेलामधील वाद काही संपेना, अभिनेत्री म्हणाली, “मी माझी बाजू मांडली नाही आणि… “
दरम्यान मागच्या काही काळापासून उर्वशी रौतेलाचे नाव ऋषभ पंतसोबत जोडले जात होते, पण अलिकडेच सोशल मीडियावर दोघांमध्ये झालेल्या भांडणामुळे याला वेगळे वळण मिळाले. उर्वशी रौतेलाने ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत ‘मिस्टर आरपी’चा उल्लेख केला, त्यानंतर क्रिकेटर संतापला होता. उर्वशीने तिच्या मुलाखतीत, ‘ऋषभ पंतने तिला भेटण्यासाठी खूप वाट पाहिली होती’ असं म्हटलं होतं. त्यानंतर ऋभषने अभिनेत्रीवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. यानंतर पंतने हॅशटॅग वापरून ‘ताई कृपया माझा पाठलाग करणं सोड खोटं बोलण्यालाही मर्यादा असते’ असं लिहिलं होतं.