दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय व सौंदर्याची जादू दाखवणारी अभिनेत्री असिन थोट्टूमकल हिने बॉलिवूडमध्येही काम केलं होतं. ‘गजनी’, ‘रेडी’ अशा मोजक्याच चित्रपटांमध्ये तिने सलमान खान व आमिर खानबरोबर स्क्रीन शेअर केली होती. मल्याळम चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या असिनने लग्नानंतर हे क्षेत्र सोडलं. ती संसारात रमली असून मुलीचं संगोपन करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

’72 Hoorain’ चा ट्रेलर सेन्सॉर बोर्डाने केला रिजेक्ट, संतापलेले निर्माते म्हणाले, “एका मृतदेहाचे…”

अभिनय क्षेत्र सोडलं असलं तरी असिन सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिची मुलगी अरीन व पती राहुल शर्माचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. याशिवाय तिच्या लग्नाचेही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर होते. पण असिन व तिच्या पतीमध्ये सर्व आलबेल नसल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे तिने इन्स्टाग्रामवरून तिचे लग्नाचे फोटो व पतीबरोबरचे इतर फोटो डिलीट केले आहेत.

असिनने २०१६ मध्ये मायक्रोमॅक्सचा संस्थापक राहुल शर्माशी लग्न केले होते. लग्नानंतर असिनने फिल्म इंडस्ट्री सोडली. असिनने अचानक तिच्या लग्नाचे व पतीबरोबरच इतर फोटो डिलीट केल्याने ती घटस्फोट घेणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. असिनची शेवटी सोशल मीडिया पोस्ट २४ ऑक्टोबर २०२२ ची आहे. त्या पोस्टमध्ये तिने तिची पाच वर्षांची मुलगी अरिनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.