बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी तिस-या अपत्याला जन्म देणार असल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. आपल्याला तिसरे अपत्य व्हावे, अशी गौरीची तीव्र इच्छा होती. यासाठी सरोगसी पद्धतीने हे दाम्पत्य तिस-या मुलाला जन्म देणार असल्याचे देखील या वृत्तात म्हंटले आहे.
शाहरूख आणि गौरी यांच्या लग्नाला २२ वर्षे पूर्ण झाली असून, त्यांना १५ वर्षांचा आर्यन आणि १३ वर्षांची सुहाना ही दोन मुले आहेत. दूरदर्शनवरील फौजी या मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात करणा-या शाहरूख नंतर बॉलिवडचा सुपरस्टार झाला. आमीर खान आणि किरण राव यांनी डिसेंबर २०११ मध्ये  सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला होता.

Story img Loader