बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याची पत्नी आपल्या पतीच्या नावाचा तोरा न मिरवता आज स्वतःच्या पायावर उभी आहे. गौरी उत्तम इंटेरियर डिझायनर आहे. तिने डिझाइन केलेल्या ‘अर्थ’ या रेस्तराँचे रविवारी उदघाटन करण्यात आले. या सोहळ्याला शाहरुखने त्याची मुलगी सुहाना खान हिच्यासोबत हजेरी लावली होती. यावेळी सर्वांच्या नजरा सुहानावरच खिळल्याचे पाहायला मिळाले. तसेच, एका उत्तम यजमानाची जबाबदारीही तिने पार पाडली. अनिल कपूर, फराह खान, अर्जुन कपूर यांचे तिने स्वतः स्वागत केले. काल फादर्स डेही असल्यामुळे शाहरुख एका अभिमानी पित्याप्रमाणे सुहानासोबत रेस्तराँमध्ये येताना दिसला. त्याने मुलीसोबत फोटोग्राफर्ससाठी पोजही दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : ऐश्वर्याला ‘कोल्हीण’ का म्हणाली कतरिना?

सुहाना काही दिवसांपूर्वीच १७ वर्षांची झाली असून तिला अभिनेत्री होण्याची इच्छा आहे. आपल्या मुलीने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास शाहरुखची अजिबात ना नाही. मात्र, सुहानाने आधी तिचे शिक्षण पूर्ण करावे ही एकमेव अट त्याने तिच्यासमोर ठेवली आहे. तत्पूर्वी या भावी अभिनेत्रीच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा याआधीच सर्वांकडून होत असल्याचे दिसलेय. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सुहानाने काम केलेल्या शॉर्ट फिल्मची व्हिडिओ क्लिप ट्विटरवर टाकली होती. त्यावर त्यांनी लिहिलेल की, ‘सुहाना पुढे जाऊन एक उत्तम अभिनेत्री होणार हे माझे शब्द आहेत. मी तिची शॉर्ट फिल्म पाहिली. माझ्याकडून तिला आशीर्वाद.’ आपल्या मुलीची प्रशंसा इतक्या मोठ्या अभिनेत्रीने केल्यावर कोणत्याही वडिलांची मान अभिमानाने ताठ होईल यात शंका नाही. माझ्या छोटीसाठी तुमचे शब्द प्रेरणादायी असल्याचे त्यानंतर त्याने ट्विट केले. सुहाना लवकरच अभिनयाचे धडे घेण्यासाठी लंडनमधील ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेणार असल्याचे म्हटले जातेय.

वाचा : ‘त्या’ रेल्वे प्रवासामुळे शाहरूख पुन्हा एकदा अडचणीत

‘अर्थ’ रेस्तराँमध्ये झालेल्या पार्टीला जॅकलीन फर्नांडिस, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, मलायका अरोरा खान, सुशांत सिंग राजपूत, क्रिती सनॉन आणि इतरही काही कलाकारांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान, शाहरुख लवकरच ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At grand opening of arth all eyes on suhana khan as she steps out like a diva with daddy shah rukh khan