अभिनेता सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहुल उद्या विवाहबद्ध होणार आहेत. कालच यांच्या मेहंदी, हळद यांसारख्या लग्नापूर्वीच्या सर्व समारंभांना सुरुवात झाली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर हे लग्न होणार आहे. त्यांच्या बंगल्याचे आणि बंगल्याला केलेल्या डेकोरेशनचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आपल्या लग्नाबद्दल अथिया आणि राहुल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अथिया आणि राहुल गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. अखेर उद्या म्हणजे २३ जानेवारी रोजी ते बोहल्यावर चढणार आहे. हा लग्नसोहळा अगदी खाजगी पद्धतीने होणार आहे. या लग्नात अथिया आणि राहुल यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार असे फक्त शंभरच जण उपस्थित राहतील असं समोर आलं होतं. तर आता या लग्नात उपस्थित राहणाऱ्यांना एक महत्वाचा नियम पाळावा लागणार आहे.

आणखी वाचा : घरात हटके वस्तू, बाहेर हिरवंगार लॉन…; अथिया-राहुलचा लग्नसोहळा होणाऱ्या सुनील शेट्टींच्या आलिशान बंगल्याचे फोटो व्हायरल

विकी-कतरीना, आलिया-रणबीर यांच्याप्रमाणेच अथिया आणि राहुल यांनाही आपलं लग्न आपल्या जवळच्या माणसांमध्ये करायचं आहे. त्यासाठी त्यांनी अगदी मोजक्याच मंडळींना आमंत्रण दिलं आहे. तसंच विकी-कतरीनाच्या पावलावर पाऊल टाकत अथिया आणि राहुल यांनीही त्यांच्या लग्नात सहभागी होणाऱ्या मंडळींना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे.

हेही वाचा : ‘पठाण’च्या पहिल्या शोची तिकिटं मिळत नसल्याने चाहत्याने थेट घेतली किंग खानकडे धाव, अजब मागणी ऐकून शाहरुख म्हणाला…

त्याचप्रमाणे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचे मोबाईल फोन ते लग्नाच्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच काढून घेतले जातील. त्यांना या लग्न सोहळ्याचे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करण्यावर बंदी असेल, असंही बोललं जात आहे. पण याबाबत अथिया किंवा राहुलच्या कुटुंबीयांकडून कोणताही अधिकृत भाष्य केलं गेलेलं नाहीये. अथिया आणि राहुलच्या लग्नात बॉलिवूड कलाकरांसह क्रिकेटर्सही हजेरी लावणार आहेत. सध्या सर्वत्र अथिया आणि राहुल यांच्या लग्नाची चर्चा आहे.