सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल एकमेकांना डेट करत असल्याचं जगजाहिर आहे. पण या दोघांनी अजूनही आपल्या नात्याची फारशी उघडपणे कबुली दिली नाही. अथिया-केएल राहुल लवकर विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही सध्या चर्चा रंगत आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली असून साऊथ इंडियन पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं बोललं जातंय. आता या दोघांबाबत एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे.

सतत होत असणाऱ्या चर्चांनुसार, अथिया-केएल राहुलने लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. ४बीएचकेचं आलिशान घरामध्ये हे दोघं राहणार होते. आता तर त्यांनी फ्लॅटच खरेदी केला असल्याची चर्चा आहे. वांद्रे येथील पाली हिल परिसरात त्यांनी अलिशान घर खरेदी केलं असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या शेजारी हे बहुचर्चित कपल राहणार आहे.

आणखी वाचा – कियाराला स्वतःचा ड्रेसही सांभाळता येईना, बोल्ड लूक झाला कॅमेऱ्यात कैद

आलिया-रणबीरच्या वास्तू येथील घराशेजारीच अथिया-केएल राहुलने घर खरेदी केलं आहे. म्हणजेच आलिया-रणबीरला आता नवी शेजारी मिळणार आहेत. अथिया-केएल राहुलचं नवं घर पाली हिल येथील इमारतीच्या नवव्या माळ्यावर आहे. सध्या तरी या इमारतीचं काम सुरू असल्याचं बोललं जातंय. केएल राहुल १० लाख रूपये भाडं असणाऱ्या घरात राहत आहे. नव्या घराचं संपूर्ण काम झाल्यानंतर तो तिकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. अथिया आणि तिची आईच या नव्या घराचं संपूर्ण डिझाइन करणार आहेत.

आणखी वाचा – अपघाताच्या २६ दिवसांनंतर मलायकाचा ‘तो’ फोटो आला समोर, कपाळावर दिसली खूण

हे नवं घर केएल राहुल की सुनिल शेट्टीने खरेदी केलं आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही, गेल्या ३ वर्षांपासून अथिया-केएल राहुल रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचे बरेच एकत्रित फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

Story img Loader