बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. पण त्या आधिच अथिया आणि राहुल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यासाठी त्यांनी भाडेतत्वावर एक घरही पाहिलं आहे. पण आता अशी माहिती समोर आली आहे की या दोघांनी नुकत्याच लग्न बंधनात अडकलेल्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या शेजारीच घर घेतलं आहे.
अथिया आणि राहुल यांनी घेतलेले हे घर पाली हिल येथील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावर आहे. सध्या या घराचं रिनोवेशनचं काम सुरु आहे. तो पर्यंत ते दोघे भाडेतत्वार असलेल्या घरात राहणार आहेत. पण अथिया आणि राहुलने पाली येथे घेतलेलं हे घरं रणबीर कपूरच्या ‘वास्तू’ घराच्या बाजूला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनील शेट्टी यांनी हे घर त्यांच्या लेकीसाठी घेतलं होतं. कारण काही दिवसांपूर्वी सुनील त्यांची पत्नी आणि लेक अथियासोबत इथे आले होते. तर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की हे घर केएल राहुलने विकत घेतले आहे.
आणखी वाचा : आई कुठे काय करते : यशला सोडून गौरी अमेरिकेला जाणार का?
आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?
राहुल आणि अथिया हे गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तर डिसेंबर महिन्यात हे दोघं लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.