बॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या लग्नबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल पाठोपाठ आता अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया व मुलगा अहान शेट्टी विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांवर आता स्वत: सुनील शेट्टीने वक्तव्य करत पूर्ण विराम दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकिकडे अथिया गेल्या काही दिवासांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलला डेट करत आहे. त्यांचे एकत्र फिरतानाचे, डिनर डेटला जातानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गेली जवळपास ३ वर्षे ते रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे अहान शेट्टी हा फॅशन डिझायनर तानिया श्रॉफला डेट करत आहे. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सतत चर्चेत असतात.
Video: ‘पुष्पा’ गाण्यावरील वॉर्नरचा डान्स पाहून अल्लू अर्जुन म्हणाला…

बॉलिवूड हंगामाला शेट्टी कुटुंबाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, सुनील शेट्टी यांची दोन्ही मुले, अथिया आणि अहान २०२२मध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. ‘आथिया- राहुल यांचे यावर्षी लग्न होणार आहे. या कपलने कुटुंबीयांची परवानगी घेतली आहे. अहान तानिया श्रॉफसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ते दोघेही लग्न करणार आहेत. २०२२मध्ये ते लग्न करणार आहेत’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता या सर्वावर सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी एक बातमी वाचली. ती वाचून मी आनंदी होऊ की दु:ख व्यक्त करु हे मला कळत नाहीये. कोणतीही माहिती देण्यापूर्वी ती एकदा तापासून घ्यावी’ या अशयाचे ट्वीट सुनील शेट्टीने केले आहे.