अभिनेता सुनील शेट्टीची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल एकमेकांना डेट करत असल्याचं जगजाहिर आहे. पण या दोघांनी अजूनही आपल्या नात्याची फारशी उघडपणे कबुली दिली नाही. अथिया-केएल राहुल पुढील तीन महिन्यांमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही सध्या चर्चा रंगत आहेत. सतत होणाऱ्या चर्चांमागे नेमकं सत्य काय? याबाबत सुनिल शेट्टी आणि अथियाने स्वतः खुलासा केला आहे.
आणखी वाचा – अथिया- केएल राहुलचं ठरलं! कधी आणि कुठे पार पडणार सुनील शेट्टीच्या लेकीचा शाही विवाहसोहळा?
अथिया-केएल राहुलने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली असून दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं बोललं जात होतं. पण या चर्चांना कंटाळून अथियाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने म्हटलं की, “पुढच्या ३ महिन्यांमध्ये जे लग्न होणार आहे त्या लग्नासाठी मलाही आमंत्रण असेल अशी मी आशा करते.” अथियाने सतत होणाऱ्या चर्चांना या पोस्टच्या माध्यमातून पूर्णविराम दिला आहे.
तर सुनील शेट्टी यांनी देखील लेकीच्या लग्नाच्या अफवांबाबत स्पष्टच सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की, “लग्नाबाबत अजूनही कोणतीच तयारी नाही.” याआधी अथियाचा भाऊ अहानने देखील या लग्नाच्या निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं होतं. म्हणजेच अथिया-केएल राहुलचं लग्न येत्या काही महिन्यांमध्ये होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
आणखी वाचा – Photos : परी म्हणू की सुंदरा…; प्राजक्ता माळीच्या नव्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा
याआधी डिसेंबरमध्ये अथिया-राहुल लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. अथिया आणि केएल राहुल नेहमीच एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. आता या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची सारेच जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.