बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के एल राहुल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. ते दोघेही एकमेकांना डेट करत असून नुकतंच त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केली आहे. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. केएल राहुल गेल्या काही दिवसांपासून काही जुने व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओवर अथियाने कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘थँक्यू २०२१’ असे म्हटले आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकानी कमेंट केल्या आहेत. त्यासोबतच अथियाने कमेंट करत ‘1062’ असे म्हटले आहे. पण अथियाने अशी कमेंट का केलीय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अथिया या नंबरच्या माध्यमातून काय सांगू इच्छिते असा विचार चाहते करत आहेत.
आणखी वाचा : कार शेजारी भाजपाचे लोक आहेत, तरीही मोदींना भीती वाटते; अभिनेत्याने केला व्हिडीओ शेअर
केएल राहुलच्या या पोस्टवर यूजर्सने कमेंट करत 1062 हा त्यांचा रुम नंबर आहे. तर दुसऱ्या एका यूजरने त्यांच्या रिलेशनला 1062 दिवस झाल्याचे सांगितले आहे. तर काहींनी 10-6-22 ही त्यांच्या लग्नाची तारीख असल्याचे म्हटले आहे. पण आकडा नेमका कसला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही झळकली आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. त्यातच आता अथिया व राहुल या जोडीची भर पडली आहे. एका ब्रॅण्डच्या जाहिरातीदरम्यान अथिया आणि राहुलची मैत्री झाली. भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर असताना राहुल आणि अथियाच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या टूरवर दोघसोबत गेल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर लक्षात आलं.