प्रेक्षकांची कसंही करून घटकाभर करमणूक करणं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडे हल्ली बहुसंख्य नाटकं काढली जातात. गल्ला कमावणं हाच त्यामागचा निर्मात्यांचा हेतू असतो. तसा तो असायलाही हरकत नाही. व्यवसाय म्हटला की नफा कमावणं गृहीतच असतं. तथापि हे कलेचं क्षेत्र आहे. त्यामुळे निव्वळ धंदा हाच एकमेव उद्देश समोर ठेवून नाटय़निर्मिती करणं योग्य नाही. असो. पण तरीही अशांचीच संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. ‘अतिथी देवो भव’ हे नुकतंच रंगमंचावर आलेलं नाटक याच जातकुळीतलं. काहीही करून विनोद ‘घडवायचा’ आणि प्रेक्षकाला रिझवायचं, हाच या नाटकाचा हेतू आहे. वैभव अर्जुन परब लिखित या नाटकाशी दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते राजन भिसे अशी रंगभूमीशी संबंधित संवेदनशील नावंही जोडली गेलेली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुळात हा एक मेलोड्रामा आहे. आप्पा नेनेंच्या मुलीच्या साखरपुडय़ाचा कार्यक्रम उद्यावर आलेला असताना ती विल्यम परेरा या तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून जाते. तिच्या या करणीने आप्पा नेन्यांना प्रचंड धक्का बसतो. तशात साखरपुडय़ाचा मंडप आणि कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले मोरेश्वर मोघे त्यांच्याकडे बिलाचा तगादा लावतात. दुसरीकडे साखरपुडय़ाला येणाऱ्या पाहुण्यांचे फोन येत असतात. या सर्वाना आता काय सांगायचं, कसं तोंड दाखवायचं, या चिंतेनं नेने हैराण झालेत. तशात मोघ्यांचा हा ताप वाढवणारा तगादा. या साऱ्या कटकटींनी कावलेले नेने एकीकडे मोघ्यांची पिडा कशी टाळायची, या विवंचनेत व्यग्र असतानाच एक अनाहुत इसम त्यांच्या घरी येतो आणि मोघेंना कानाखाली वाजवून त्यांना चक्क पिटाळून लावतो. या अनपेक्षित भयंकर प्रकाराने नेने दिङ्मूढच होतात. कोण कुठला हा इसम? त्याने सरळ आपल्या घरात घुसून मोघ्यांवर हात उगारावा? आता आणखी काय काय आपल्यापुढे वाढून ठेवलंय कुणास ठाऊक?.. अशा उलटसुलट विचारांनी बेचैन होऊन ते त्या उपटसुंभ इसमाला हाकलू बघतात. परंतु तो जाता जात नाही. उलट तो- आपलं नाव भाऊ मालवणकर असून, नेन्यांच्या शेजाऱ्यांना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी वेंगुल्र्याहून खास आलो होतो, असं सांगत आपला परिचय करून देतो. नेने त्याला हाकलू बघतात, पण त्यांची बायको शालू हीसुद्धा वेंगुल्र्याचीच असल्याने तिला या पाहुण्याबद्दल अचानक प्रेम उफाळून येतं. ती आपल्या या माहेरवासी पाहुण्याचा अगदी मायेनं पाहुणचार करते.
भाऊ मालवणकर पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखा मग नेन्यांच्या घरातच सरळ मुक्काम ठोकतो. नेन्यांना टोमणे मारत, त्यांचा पाणउतारा करत आणि शालूची भलामण करत भाऊची अखंड बडबड सुरू राहते. त्याच्या मुलीचंसुद्धा विल्यम परेरा नावाच्या मुलाशीच लग्न ठरलेलं आहे. तो विमानाचा पायलट आहे. आपल्या जावयाचे गुणगान गाताना भाऊ मालवणकरला किती सांगू आणि किती नको असं होतं. ‘परजातीतला असला म्हणून काय झालं? लाख माणूस आहे माझा जावई!’ असं म्हणत तो नेन्यांना खिजवतो. परंतु कर्मठ नेन्यांवर भाऊ मालवणकरने सांगितलेल्या या कथेचा काहीएक परिणाम होत नाही. ते आपल्या भूमिकेवर ठाम असतात. त्यांना एक ख्रिस्ती तरुण आपला जावई होणार, हे काही केल्या पचनी पडणंच शक्य नसतं.
..काय होतं पुढं? कोण असतो हा भाऊ मालवणकर? आप्पा नेने अखेरीस वास्तव स्वीकारतात काय? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच उचित.
वैभव अर्जुन परब यांनी येनकेन प्रकारेण मनोरंजन हाच हेतू समोर ठेवून हे नाटक लिहिलं आहे. त्याकरता भाऊ मालवणकरच्या रूपात आगाऊ, विक्षिप्त, निल्र्लज्ज आणि भोचक असं एवंगुणविशिष्टअर्कचित्रात्मक पात्र उभं करून त्यांनी नाटकातील तथाकथित विनोदाची जंगी ‘व्यवस्था’ केली आहे. त्याच्याच जोडीला हवालदार पवारचं तेवढंच इरसाल पात्र निर्माण करून उरलीसुरली कसरही भरून काढली आहे. फक्त या पात्राच्या बाबतीत त्यांनी काहीशी तार्किकता सांभाळली आहे, इतकंच. भरीस भर म्हणून घरातल्या समस्येकडे पाठ करून डोक्यात जाणाऱ्या अनाहुत पाहुण्याच्या सरबराईत धन्यता मानणाऱ्या बावळट व मूर्ख शालूची योजना करून लेखकाने प्रेक्षकांच्या बुद्धीची यत्ताही ठरवून टाकलेली आहे. उरले.. सनातनी विचारांचे आप्पा नेने! ऐन साखरपुडय़ाच्या आदल्या दिवशी आपली मुलगी एका खिरीस्तांवाचा हात धरून घरातून पळून गेल्याने बसलेल्या धक्क्याने सैरभैर झालेले हे गृहस्थ संतापाचा उद्रेक असह्य़ होऊन सदासर्वकाळ घर डोक्यावर घेताना दिसतात. अर्थात ते समजण्यासारखं आहे. अशी माणसं यावेगळं काही करू शकत नाहीत. परंतु पोटच्या मुलीच्या मायेपोटी हळव्या झालेल्या बापाचं अंतस्थ अस्तरही या पात्राला दिल्यानं आप्पा नेने हे ‘माणूस’ म्हणून या सगळ्यांत वेगळे उठून दिसतात.
दिग्दर्शक विजय केंकरे यांनी प्रयोग सुविहित बसवला आहे. या नाटकात भाऊ मालवणकरच्या लीला प्रारंभी सह्य़ वाटून घेतल्या तरी पुढे पुढे त्यांचा नॉशिया येतो. आपण हे काय आणि कशाकरता बघतो आहोत, असा प्रश्न आपल्याला पडू लागलेला असताना अकल्पितपणे नाटकाला कलाटणी मिळते आणि भाऊच्या या मर्कटलीलांचा उलगडा होतो आणि त्याच्याबद्दल क्षणिक सहानुभूती निर्माण होते खरी; परंतु तोवर आगाऊगिरीच्या सगळ्या मर्यादा उल्लंघणारं त्याचं वागणं-बोलणं आणि नेन्यांच्या घरात शालूकडून होणारा त्याचा भीषण पाहुणचार हे सारं असह्य़तेच्या कडेलोटापर्यंत गेलेलं असतं. त्यामुळे नंतर भाऊचं खरं रूप उघड झाल्यावरही त्याच्याबद्दल निर्माण होणारी सहानुभूतीही कोरडी ठरते.
प्रदीप सुळे यांनी कनिष्ठ मध्यमवर्गीय आप्पा नेन्यांचं पोपडे गेलेलं घर वास्तवदर्शी उभं केलं आहे. तर राजन ताम्हाणे यांनी प्रकाशयोजनेतून काळाचं आणि नाटय़ांतर्गत मूड्सचं चपखल सूचन केलं आहे. नितीन कायरकरांचं पाश्र्वसंगीत, मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि शरद व सागर सावंत यांची रंगभूषा आपापली भूमिका चोख पार पाडणारी.
राजन भिसे यांनी कर्मठ विचारांचे संतापी आप्पा नेने साकारताना त्यांच्यातला हळवा, कोमलहृदयी पिताही सतत डोकावत राहील याची काळजी घेतली आहे. शालू झालेल्या लेखा मुकुंद यांनी लेखकानं दिलेली ‘भूमिका’ चोख वठवली आहे. विनय येडेकर यांनी नको इतका आगाऊ, निलाजरा आणि भोचकपणाचा अर्क असलेला भाऊ मालवणकर यथातथ्य उभा केला आहे. विल्यम परेराबरोबरचा भाऊचा संवाद फाटक्या कोकणी माणसाचं अस्सल चित्रण करणारा लाटतो. अमर कुलकर्णीचा हवालदार पवार हे अस्सल पोलिसी बेणं आहे. मोरेश्वर मोघे झालेले मोहन साटम लक्षवेधी ठरलेत. हृषिकेश दळींचा खिरीस्तांव विल्यम परेराही लोभस.