अनंत अंबानी (Anant Ambani) व राधिका मर्चंट (Radhka Merchant) १२ जुलैला लग्नबंधनात अडकले. दोघेही लग्नानंतर जामनगरला गेले आहेत. अशातच त्यांच्या लग्नाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाचा अॅनिमेटेड चित्रपट बनविण्यात आला आहे. हा चित्रपट शाहरुख खानबरोबर सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे. तसेच या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नाला जगभरातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. महानायक अमिताभ बच्चन, त्यांचे कुटुंबीय, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, रणबीर आलिया यांच्यासह अनेक दिग्गज बॉलीवूड सेलिब्रिटी व दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारही हजर होते. अनंत व राधिकाच्या लग्नाचा १० मिनिटांचा ॲनिमेटेड चित्रपट दिग्दर्शक ॲटली कुमारने बनवला आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली आहे. रणवीरने अनंत-राधिकाच्या लग्नाच्या कार्यक्रमांना उपस्थित होता.
रणवीर अलाहाबादियाने अमेरिकन कॉमेडियन-अभिनेता आकाश सिंहबरोबर एक पॉडकास्ट केला. यामध्ये त्याने अंबानींच्या लग्नातील अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लग्नातील पाहुण्यांसाठी १० मिनिटांचा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट ॲटली यांनी दिग्दर्शित केला होता, हा एक ॲनिमेटेड चित्रपट होता आणि व्हॉइसओव्हर अमिताभ बच्चन यांनी केला होता. ही एक मायक्रो फिल्म होती.”
रणवीरने अनंत अंबानींच्या लग्नाच्या वरातीबद्दलही सांगितलं. “त्यांनी वरातीच्या रस्त्यावर स्टेशन उभारले होते, प्रत्येक स्टेशनवर एक म्युझिक सुपरस्टार होता. कोणत्याही सामान्य लग्नात, तुम्ही पूर्ण क्रू सोबत चालता आणि पुढे जाता. पण इथे प्रत्येक स्टेशनवर सगळे थांबत होते व मिनी कॉन्सर्ट करत होते आणि कलाकार मनसोक्त नाचत होते,” असं रणवीर म्हणाला.
अनंत-राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम
अनंत व राधिकाच्या लग्नाचे विविध सोहळे जवळपास १० दिवस होते. मामेरू कार्यक्रम, संगीत नाईट, शिव पूजा, गृह शांती पूजा, हळदी, मेहंदी, लग्न, शुभ आशीर्वाद समारंभ व रिसेप्शन असे कार्यकर्म अनंत-राधिकाच्या लग्नात होते. या कार्यक्रमांमध्ये देशातीलच नाही तर विदेशातील पाहुणेही आले होते. अनंत-राधिकाच्या संगीतमध्ये जस्टिन बीबरने परफॉर्म केलं, तर हळदी समारंभात राहुल वैद्य आणि लग्नाच्या वरातीत ‘Baby Calm Down’ फेम रॅपर रेमाने त्याचं लोकप्रिय गाणं गायलं. अनंत व राधिकाच्या लग्नाला एक आठवडा झाला असला तरी त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत.