अभिनेत्री सारा अली खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट येत्या २४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सारा आणि धनुष यांनी त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण जोहरच्या ‘कॉफी शॉट्स विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमध्ये असं काही घडलं की, धनुषनं क्षणार्धात साराची बोलती बंद केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कॉफी शॉट्स विथ करण’चा नवा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये करण जोहर, सारा आणि धनुष यांचं स्वागत करताना दिसत आहे. करण जोहरनं यावेळी सारा आणि धनुष यांना काही प्रश्न विचारले. ज्याची या दोघांनीही धम्माल उत्तरं दिली आहेत.

करण धनुषला विचारतो, ‘जर एका सकाळी तू रजनीकांत म्हणून उठलास तर काय करशील?’ त्यावर धनुष म्हणतो, ‘मी कायमचा रजनीकांत होऊन राहणं पसंत करेन.’ त्यानंतर करणनं सारा विचारलं, ‘तुझं स्वयंवर झालं तर त्यात तुला कोणत्या चार अभिनेत्यांना बोलवायची इच्छा आहे?’ करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना सारा म्हणाली, ‘रणवीर सिंह, विजय देवरकोंडा, विक्की कौशल आणि वरुण धवन.’ पण खरी मज्जा तर तेव्हा येते जेव्हा करण जोहर, सारा आणि धनुषसोबत गेम खेळायला सुरुवात करतो.

करण जोहरसोबत बझर गेम खेळताना धनुष आणि सारा खूप धम्माल करताना दिसत आहेत. सारा या गेममधील जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तर देते. पण एका प्रश्नावर मात्र धनुष साराची बोलती बंद केली. करणनं या गेममध्ये प्रश्न विचारला, ‘तुम्ही कोणत्याही ५ दाक्षिणात्य दिग्दर्शकांची नावं सांगा.’ ज्यावर सारा गोंधळलेली पाहायला मिळाली. तिची बोलतीच बंद झाली आणि धनुष मात्र आरामात बझर वाजवताना दिसला. कारण त्याला ही नावं माहीत होती.

सारानं ‘केदाराथ’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘अतरंगी रे’ हा तिचा ५ वा चित्रपट आहे. सारा अली खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘अतरंगी रे’ येत्या २४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atrangi re stars dhanush and sara ali khan on coffee shots with karan video goes viral mrj