सिनेमा, सौजन्य –
अतुल कुलकर्णी या नावाला मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळं स्थान आहे. ‘जंजीर’च्या प्रोमोज्मधून अचानक समोर येणारा अतुल कुलकर्णीचा चेहरा जसा त्याच्या चाहत्यांना सुखावतो तसाच ‘पोपट’ चित्रपटातील त्याचा वेगळा ‘लूक’ही आपल्याला खुणावतो. आणि त्याच वेळी ‘सावधान मुंबई- फाइट्स बॅक’सारख्या कार्यक्रमातून तो सूत्रसंचालन करणार हे ऐकल्यावर त्याच्यासारख्या अभिनयसंपन्न नटातला वैचारिकपणाही प्रखरपणे जाणवतो… या वेगवेगळ्या निमित्तांनी अतुलशी मारलेल्या गप्पा-
प्रश्न : ‘पोपट’सारखा ग्रामीण पाश्र्वभूमी असणाऱ्या कथेवरचा चित्रपट स्वीकारताना नेमका काय विचार होता?
उत्तर : ‘पोपट’ चित्रपटातील कथेची पाश्र्वभूमी ग्रामीण आहे, असं म्हणूया आपण. पण माझ्या मते तुमची कथा जितकी मातीतली असते तितकी ती वैश्विक स्तरावर लोकांना भावते. इराणी चित्रपट किंवा तत्सम चित्रपट आपल्याला का भावतात, कारण ते तिथल्या स्थानिक भावभावनांशी जोडलेले असतात. आणि त्या भावभावना जितक्या स्थानिक असतील तितक्या त्या लोकांना आपल्याशा वाटतात. ‘वळू’मध्येही ते होतं. ‘वळू’ एका अर्थाने अत्यंत स्थानिक विषयावरचा चित्रपट होता. पण त्याला जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रियातल्या चित्रपट महोत्सवांमध्येही भरभरून प्रतिसाद मिळाला आणि अगदी मुंबईतल्या नरिमन पॉइंटच्या मल्टिप्लेक्सपासून ते सांगलीतल्या चित्रपटगृहापर्यंत सगळ्या प्रेक्षकांना तो तितकाच आवडला. ही प्रादेशिक चित्रपटांची ताकद आहे. म्हणजे आपली जी गोष्ट आहे ती आपण आपल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच ती जगाला आवडते हे मी ‘वळू’च्या अनुभवावरून ठामपणे सांगतो. ‘नटरंग’च्या बाबतीतही हेच म्हणता येईल आणि सतीश राजवाडेच्या ‘पोपट’ चित्रपटातही तीच ताकद आहे असं मला वाटतं. या चित्रपटात मी एक साधा छायाचित्रकार आहे. लग्न समारंभ चित्रित करण्यासाठी मी एक व्हिडीओ कॅमेरा विकत घेतो आणि याच जोरावर मी माझ्या तीन मित्रांच्या कामात सामील होतो. त्यांच्याबरोबर चित्रपट करता करता कथा एका वळणावर येऊन पोहोचते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा