‘जंजीर’च्या रिमेकमध्ये अतुल कुलकर्णी साकारत असलेली पत्रकाराची भूमिका ‘मिड डे’ वृत्तवत्राचे पत्रकार जे डे यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. मित्रमंडळी आणि निकटवर्तींयांमध्ये जे डे या नावाने प्रसिद्ध असलेले ज्योतिर्मय डे हे वरिष्ठ शोधपत्रकार होते. त्यांची जून २०११ मध्ये गोळी मारुन हत्या करण्यात आली. त्यांच्या खूनाच्या आरोपाखाली इंग्रजी वृत्तपत्राची पत्रकार जिग्ना वोरा हिला २०११ साली अटक करण्यात आली होती. मात्र, जिग्नाला विशेष मोक्का न्यायालयाने २०१२ साली जामीन दिला.
‘जंजीर’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अतुल कुलकर्णी साकारत असलेली भूमिका ही एका प्रसिद्ध पत्रकारावर आधारित असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले आहे. चित्रपटाची पटकथा ही तेल माफिया आणि शोधपत्रकार यांच्या अवतीभोवती फिरत असून यातील काही घटना जे डेंच्या हत्याकांडाशी मिळत्याजुळत्या आहेत. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात राम चरण तेजा, प्रियांका चोप्रा आणि संजय दत्त यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ चित्रपटातील अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि प्राण यांच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘जंजीर’चा रिमेक ६ सप्टेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
अतुल कुलकर्णीची ‘जंजीर’च्या रिमेकमधील भूमिका जे डें यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित
'जंजीर'च्या रिमेकमध्ये अतुल कुलकर्णी साकारत असलेली पत्रकाराची भूमिका 'मिड डे' वृत्तवत्राचे पत्रकार जे डे यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. मित्रमंडळी आणि निकटवर्तींयांमध्ये जे डे या नावाने प्रसिद्ध असलेले ज्योतिर्मय डे हे वरिष्ठ शोधपत्रकार होते.
First published on: 05-07-2013 at 05:39 IST
TOPICSअतुल कुलकर्णीAtul Kulkarniजया बच्चनJaya Bachchanप्राणप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसंजय दत्तSanjay Duttहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 6 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul kulkarnis role in zanjeer remake inspired by j dey