Atul Parchure : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरे यांनी मागच्या वर्षी कर्करोगावर मात केली होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. राज ठाकरे यांनी अतुल परचुरेंबाबत ( Atul Parchure ) एक पोस्ट लिहिली आहे.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

आज आमचा अतुल ( Atul Parchure ) गेला…. एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. आम्ही शाळेत असतानाचा काळ असा होता की सिनेमाच्या जगातले राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो पण अर्थात आमच्यापासून मैलांवरचे असलेले हिरो किंवा आम्ही त्यांचे चाहते म्हणू. पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे ( Atul Parchure ). तो त्या काळात बजरबट्टू नावाच्या नाटकात काम करायचा . शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट. अतुल ( Atul Parchure ) हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Raj Thackeray told this thing About Ratan Tata
Ratan Tata : “..त्यावेळी रतन टाटांनी खुर्चीतल्या मृतदेहाशी संवाद साधला आणि..”, राज ठाकरेंनी सांगितला होता भन्नाट किस्सा
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Chennai air show tragedy
Chennai Air Show: ‘तो दुचाकी आणण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही’, पत्नीनं सांगितली पतीच्या मृत्यूमागची कहाणी
mridula tripathi pankaj tripathi
जिच्यासाठी मुलगा पाहायले गेला, तिच्याशीच नंतर केलं लग्न; बॉलीवूड अभिनेत्याची फिल्मी लव्ह स्टोरी, पत्नीला ठेवलेलं मुलांच्या वसतिगृहात
Loksatta vyaktivedh Madhura Jasraj Paraphrase of V Shantaram autobiography movie
व्यक्तिवेध: मधुरा जसराज
Janhvi Kapoor share Sridevi and boney Kapoor memories
लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”
Raj Kapoor was not in the hospital when granddaughter Karisma Kapoor was born
नात करिश्मा जन्मल्यावर तिला पाहायला जाण्यासाठी राज कपूर यांनी दिला होता नकार, ठेवली होती ‘ही’ अट
Shibani Dandekar praised husband farhan akhtar first wife
मराठमोळ्या शिबानी दांडेकरने पतीच्या पहिल्या बायकोचं केलं कौतुक; सावत्र मुलींबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली, “त्या खूप…”

हे पण वाचा- Atul Parchure : अतुल परचुरेंना पुलंचा आशीर्वाद कसा लाभला होता? पेटीवर वाजवून दाखवलेल्या ‘कृष्ण मुरारी’ गाण्याचा किस्सा काय?

अतुल आमच्यासाठी सेलिब्रिटी होता

शाळेत असताना त्याचा आणि माझा फारसा मैत्र नव्हता, पण आमच्या साठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता ! कॉलेजला गेल्यावर जरी आमची कॉलेजेस वेगळी होती तरी आमची मैत्री झाली आणि ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्ली मधलं काम पु.ल. देशपांड्यांनी फक्त पाहिलं नाही तर त्याला दाद देखील दिली.

अतुलने माझ्या पक्षाचाही फॉर्म भरला होता-राज ठाकरे

मी जेंव्हा पक्ष स्थापन केला, तेंव्हा अतुलने ( Atul Parchure ) पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म देखील भरला होता. तेंव्हाच्या राजकीय परिस्थितीत एखाद्या कलाकाराने असं पाऊल उचलणं हे धाडस होतं, पण ते त्याने दाखवलं. तो पुढे माझ्या कुटुंबाचा भाग बनला होता. कायम आनंदी, जरा जास्तच गुटगुटीत असा हा आमचा मित्र, ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो, असा अतुल जेंव्हा कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आला, आणि जेंव्हा तो खंगला होता, तेंव्हा तो आमच्या मित्रांपैकी कोणालाच बघवत नव्हता. पण अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता.

अतुलने अकाली एक्झिट घेतली

मी म्हणलं तसं अतुल ( Atul Parchure ) हा प्रतिभावान कलावंत होता आणि वृत्तीने आनंदी होता. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपट केले, टीव्ही मालिका केल्या, हिंदीत पण त्याने अनेक टीव्ही शो केले पण अतुल हा खरा रंगकर्मी. त्याचा रंगमंचावरचा वावर, त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा असलेला सेन्स सगळंच अप्रतिम होतं. अभिनयावर कमालीचं प्रेम असलेल्या अतुलने अकाली ‘एक्झिट’ घेतली, पण जाताना रंगभूमीपासून, सर्व मित्रांच्या आयुष्यातलं काही तरी निखळलं ही भावना ठेवून गेला. आमच्या या मित्राला माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली. अशी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिली आहे.

अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता

अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, त्यातूनही ते बाहेर आले होते, त्यांच्या जिद्दीचं कौतुक झालं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे. नाटक, सिनेमा, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अतुल परचुरेंना कर्करोग झाला हे ऐकून अनेकांना धक्का बसला होता. त्यांनी त्यांच्या वेदना विविध मुलाखतींमध्ये सांगितल्या होत्या. अशात आता वेदना देणारी ही बातमी समोर आली आहे.