सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘हॅपी जर्नी’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीपासून ते चित्रपटाचा विषय, त्यातील भूमिका, चित्रपटासाठी कलाकार घेत असलेली विशेष मेहनत हे चर्चेचा विषय बनले होते. आता तर यात अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट-कामत हे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सचिन कुंडलकर यांनी सांगितले आहे.

‘हॅपी जर्नी’मध्ये अतुल कुलकर्णी, प्रिया बापट-कामत आणि पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र, हे तिघेही कोणते पात्र साकारणार आहेत याबाबतची माहिती अद्यापपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. यातील अतुल आणि प्रियाची जोडी ही भावा-बहिणीच्या नात्यात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खुद्द अतुल कुलकर्णीनेही याबाबत फेसबुकवर पोस्ट केले आहे. या भावा-बहिणीमध्ये भन्नाट केमिस्ट्री, मजा आणि सुंदर भावना दिसून येणार आहेत. मात्र, पल्लवी सुभाष यात काय भूमिका साकारतेय याबाबत अजून काहीच सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे अतुल-प्रिया-पल्लवी या त्रिकुटाची कहाणी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Story img Loader