मितेश रतिश जोशी
छोटय़ा पडद्यावर प्रेक्षकांकडून जेवढं नायक- नायिकेला प्रेम मिळतं, त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स, कौतुक आणि प्रेम सध्या बालकलाकारांना मिळताना दिसतं आहे. बडय़ा कलाकारांबरोबर हे छोटे कलाकार अभ्यास सांभाळून सेटवर कसं काम करतात? त्यांची नेमकी निवड कशी होते? या सगळय़ाचा बालदिनाच्या निमित्ताने घेतलेला हा विशेष आढावा.

मुलं आणि मनोरंजन क्षेत्राचं नातं पूर्वापार आहे. थोडं मागे वळून पाहिलं तर लहानपणी आवड म्हणून हौसेनं अभिनय क्षेत्रात वळलेले, प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमुळे याच क्षेत्रात कारकीर्द घडवलेले असे अनेक कलाकार हिंदूी- मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वात आहेत. त्याकाळी बालकलाकारांना एवढी पसंती मिळाली नसेल जेवढी पसंती सध्याच्या बालकलाकारांना समाजमाध्यमांमुळे मिळते आहे. सध्या बालकलाकारांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू होण्यासाठी इन्स्टाग्राम रील्ससारखी माध्यमं कारणीभूत ठरत आहेत.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील चिंगी आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील परी या दोन्ही बालअभिनेत्री सर्वप्रथम इन्स्टावर होत्या. त्यानंतर त्यांना छोटय़ा पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. या रील्समुळे बालकलाकार निवडायला मदत होत असल्याचं मत कािस्टग डिरेक्टर सारंग विजय कर्णिक याने व्यक्त केलं. ‘‘सर्वप्रथम लेखकाकडून आम्हाला भूमिकेविषयी सखोल माहिती मिळते आणि त्यानंतर आमची शोधमोहीम सुरू होते. पूर्वीच्या काळी ऑडिशन व्हायच्या तेव्हा लांबलचक रांग लागलेली पाहायला मिळायची. मुलांना आम्ही व आम्हाला मुलं नवीन असायची, पण आता समाजमाध्यमांमुळे ही ओळख आधीच झालेली असते. एखादी खटय़ाळ मुलगी आधी इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडून रील्स बनवून व्हायरल होते आणि नंतर ऑडिशनला येते, ही सध्याच्या मुलांची परिस्थिती आहे. पण याचा फायदा निश्चितच मुलांना होतो, कारण सतत रील्स बनवत असल्याने मुलांची कॅमेरासमोर जाण्याची भीती निघून गेलेली असते,’’ असं सारंग सांगतो. पूर्वी ऑडिशनची जाहिरात करण्यासाठी नाटय़गृह किंवा शाळेच्या बाहेर फलक लावले जायचे. आता समाजमाध्यमामुळे ऑडिशनची जाहिरात काही सेकंदांत व्हायरल होते, असं त्याने सांगितलं.

चित्रीकरणासाठी शाळासुद्धा साहाय्य करत असल्याचे सारंगने नमूद केले. सीबीएसई आणि आयसीआयसी बोर्डच्या अभ्यासक्रमात कला विषयासोबतच सांस्कृतिक उपक्रमांना विशेष दर्जा दिल्याने मुलं व्यवस्थित शाळा आणि अभ्यास सांभाळून चित्रीकरणाला येत आहेत, असं त्याने नमूद केलं. लहान मुलं म्हटल्यावर दंगा तर होणारच. आधी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील कार्तिकीमुळे व आता ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’मधील चिंगीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली साईशा भोईर ही इन्स्टाग्राम क्वीन सेटवर सगळय़ांना पुरून उरते. दुसरीत शिकणाऱ्या साईशाची सेटवर विशेष काळजी घेतली जाते. साईशाला ऊठबस करण्यासाठी वेगळी रूम देण्यात आली असून तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळल्या जातात. बोर्नव्हिटा, उकडलेली अंडी, मॅगी असे लज्जतदार पदार्थ तिच्यासमोर वेळच्या वेळी पेश केले जातात. शाळेच्या वेळा सांभाळून खासकरून शनिवार- रविवारी चित्रीकरणाची वेळ ठरवली जाते. सेटवर फावल्या वेळात तिला आराम मिळावा म्हणून गप्पिष्ट साईशाला जबरदस्ती झोपवले जाते. तिची आणि अनिता दाते केळकरची विशेष गट्टी आहे. ती तिला ‘फनी माऊ’ या नावाने हाक मारते. अभिनेता कश्यप परुळेकरची खऱ्या आयुष्यातली आणि मालिकेतील मुलगी म्हणजेच साईशा दोघीही एकाच वयाच्या असल्याने तो सेटवर साईशाला बरोबर सांभाळून घेतो. वेळप्रसंगी तिचा अभ्यासही घेतो.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील‘‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेतील शंकर महाराजांची बालपणीची भूमिका साकारणारा आरुष बेडेकर हा बाल शंकराच्या भूमिकेमुळे अतिशय लोकप्रिय झाला आहे. मूळचा अहमदनगरचा असलेला आरुष चौथीत शिकतो आहे. सेटवरच्या फावल्या वेळेतल्या मस्तीबद्दल आणि भूमिकेच्या निवडीबद्दल आरुष म्हणाला, ‘‘माझ्या बाबांनी बऱ्याच चित्रपटात काम केलं असल्याने त्यांना ऑडिशनचे अपडेट मिळत होते. या भूमिकेसाठी ऑडिशनला जाताना मी माझ्या मुंजीतलं सोवळं नेसून गेलो होतो. शेकडो मुलांमधून जेव्हा माझी निवड झाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी आणि माझी आजी चित्रीकरणाच्या निमित्ताने सध्या नाशिकमध्ये राहात आहोत. सुट्टी मिळाली की आम्ही अहमदनगरला जातो, तेव्हा माझे शाळेतले मित्र व त्यांचे आई बाबा भेटायला एकच गर्दी करतात.’’

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘छोटय़ा बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेतील बयोची व्यक्तिरेखा साकारणारी रुची नेरुरकर ही बालअभिनेत्री रोज बारा तास चित्रीकरण करते आहे. सहावीत शिकणारी रुची मूळची कोकणातील कुडाळमधल्या नेरुर गावात राहाते. रुची सांगते, ‘‘घर आणि चित्रीकरण स्थळ लांब असल्याने सध्या मी आणि आई कोकणातल्या पडेल गावात राहात आहोत. रोज शाळेत जायला जमत नसल्याने मला माझ्या शाळेतल्या दोन खास मैत्रिणी अभ्यासासाठी मदत करतात. चित्रीकरणातून सुट्टी मिळाली की घरी गेल्यावर सलग अभ्यास करावा लागतो. सेटवर वेळ मिळाला तर मी वाचनाला प्राधान्य देते. विक्रम दादा आणि मी छोटय़ा ब्रेकमध्ये लुडोसारखे बैठे खेळ तर खेळतोच. जर सगळय़ांना मोठा ब्रेक असेल तर लपाछपी, पकडापकडी खेळायलासुद्धा दादा आणि वीणा दीदी पुढे येतात.’’ सेटवर संवाद पटकन पाठ करावे लागतात. कमी वेळात पटकन पाठांतर करण्याची सवय लागल्यामुळे प्रश्नांची उत्तरंसुद्धा लवकर पाठ होत असल्याचे रुची सांगते.

चिंगी, बाल शंकर आणि बयो यांच्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक बालकलाकार सध्या छोटय़ा पडद्यावर कल्ला करत आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील कृष्णापा, अधिरा तसेच ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील बाल रेवणनाथ, सोयरा हे बालकलाकारदेखील त्यांच्या भूमिकांमुळे व अभिनय कौशल्याच्या जोरावर लोकप्रिय झाले आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतल्या गोंडस परीने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरच्या रील्सची सर्वानाच भुरळ पडते आहे. या सगळय़ा बालकलाकारांबरोबर काम करताना सेटवरचे सगळेच कलाकार हे कायम खुशीत असतात.

मोठय़ा कलाकारांच्या मागण्यांपेक्षा यांच्या मागण्या अगदीच क्षुल्लक वाटतात. बालकलाकार भुकेमुळे किंवा झोपेमुळेच सेटवर गोंधळ घालतात. त्यांची भूक आणि झोप सांभाळली की सेटवरसुद्धा खेळीमेळीचं वातावरण राहतं. त्यामुळे सेटवरही बालकलाकारांची आवर्जून काळजी घेतली जाते. बडय़ा कलाकारांच्या पुढय़ात धीटाईने कॅमेऱ्याला सामोरे जाणारे हे छोटे वीर छोटा पॅकेट बडा धमाका ठरत आहेत.

Story img Loader