दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत होते. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर चाहते RRR चित्रपटाचे रिव्ह्यू देत आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याला RRR चित्रपटातलं सगळ्यात जास्त काय आवडलं हे सांगत आहे. RRR चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी थिएटरमध्येच नाचत गाजत चित्रपट पाहिला त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि अजय देवगण हे सोशल मीडियावर आरआरआर या हॅशटॅगसोबत ट्रेंड करत आहेत. अनेक चाहत्यांनी RRR हॅशटॅगसोबत चित्रपटाबद्दल ट्विट केले आहे. एका नेटकऱ्याने RRR च्या थिएटरमधील एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये, प्रेक्षक चित्रपटाचा खूप आनंद घेताना दिसत आहेत, तर काही चित्रपटगृहात चित्रपट पाहिल्यानंतर नाचू लागतात. तर एका व्हिडीओत थिएटरची तोडफोड केली जात असल्याचे दिसत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे RRR हा चित्रपट संपूर्ण दाखवता आला नाही. तर चित्रपट बघता न आल्याने चाहत्यांनी संतप्त होऊन तोडफोड केली.

आणखी वाचा : “The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा”, म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अनुपम खेर यांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

आणखी वाचा : ‘ब्रा’ची जाहिरात केली म्हणून अभिनेत्रीला पाकिस्तानी चाहत्यांनी केले ट्रोल, म्हणाले “तुला लाज वाटली पाहिजे”

एसएस राजामौलीच्या ‘आरआरआर’बद्दल अपेक्षा आहे की हा चित्रपट पहिल्या दिवशी कमाईचे नवे विक्रम करू शकतो. अॅडव्हान्स बुकिंगचे समोर आलेले आकडेही आश्चर्यचकित करणारे आहेत. या चित्रपटाने थिएटर राइट्समधूनही करोडोंची कमाई केल्याचे म्हटले जातं आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट HD मध्ये लीक झाल्याचे म्हटले जातं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audience started dancing after watching ss rajamouli rrr in theater fans vandalized cinema hall for stopped screening rrr dcp