सध्या तरुण- तरुणी अचानक बेपत्ता होण्याचं प्रमाण देशात वाढत असल्याचं दिसत आहे. अशाप्रकारची वृत्त रोज आपल्यासमोर येत असतात. अशात आता औरंगाबादची प्रसिद्ध युट्यूबर काव्या यादव अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. युट्यूबर काव्या ही सोशल मीडियावर ‘बिंदास काव्या’ या नावाने लोकप्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. पण ती अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आई- वडील हैराण झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तिला घरी परतण्याचं आणि चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे.

औरंगबाद येथे राहणारी युट्यूबर काव्या यादव म्हणजेच ‘बिंदास काव्या’ ही शुक्रवारी ९ सप्टेंबरला दुपारी घरातून बाहेर पडली होती ती अद्याप घरी परतलेली नाही. तिच्या आई-वडिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला घरी येण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर काव्याच्या आईचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहेत. ज्यात त्या, “बाळा रागात असशील तर राग सोड आणि कृपया घरी ये. आम्हाला सर्वांना तुझी खूप काळजी वाटतेय. तू कुठे असशील तिथून घरी ये.” असं आर्जव आपल्या मुलीकडे करताना दिसत आहेत.
आणखी वाचा- “किमान देवाचा मान ठेव…” अंकिता लोखंडेचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

काव्या ही अवघी १६ वर्षांची आहे. घरातून बाहेर पडताना तिने आपला मोबाईलही घरी ठेवला आहे. तसेच तिच्याकडे पैसेही नसल्याचं तिच्या पालकांचं म्हणणं आहे. यासंबंधी काव्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस काव्याचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप ती न सापडल्याने काव्याच्या पालकांनी तिच्याच सोशल मीडिया हॅन्डलवरून चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे. काव्या कोणाला सापडल्यास तिच्या पालकांशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

आणखी वाचा- ट्विटरवरुन होतेय जुबिन नौटियाच्या अटकेची मागणी, वाचा नेमकं काय घडलंय

bindhast kavya is missing

दरम्यान काव्या यादव ही ‘बिंदास काव्या’ या नावाने सोशल मीडियावर लोकप्रिय होती. युट्यूबवर तिचे ४.५ मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवरही तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. तिचे अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.