जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग आला आहे. आजच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. पण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला मोठा फटका बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “त्यांनी माझे पैसे…” प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मींचा ‘हेरा फेरी’चे निर्माते फिरोज नाडियादवालांबद्दल गौप्यस्फोट

‘अवतार २’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग मधूनही रेकॉर्डब्रेक कमाई केली. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग मधून तब्बल चार कोटींहून अधिक रुपये कमावले. आता या चित्रपटाला एक धोका निर्माण झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट काही साईट्सवर लीक झाला.

आणखी वाचा : स्वतःचे चित्रपट फ्लॉप होत असतानाच अक्षय कुमारला हॉलिवूडची भुरळ, ‘अवतार २’चं कौतुक करत म्हणाला…

४०० मिलियन डॉलर बजेट असलेल्या या चित्रपटाला संपूर्ण जगात मोठ्या संख्येने स्क्रीन्स मिळाले आहेत. पण अशातच आता हा चित्रपट 1080P प्रिंटमध्ये काही साईट्सवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उपलब्ध झाला. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तो लीक होण्याची ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे आता ‘अवतार २’ या चित्रपटाला मोठं नुकसान होऊ शकतं.