‘अवतार २: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट १६ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पहिल्या भागानंतरच अवतार २साठी प्रेक्षक आतूर होते. या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रदर्शनानंतर ‘अवतार २’ने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित ‘अवतार २’ने अवघ्या १३ दिवसांत वर्ल्ड वाइड एक बिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे ‘अवतार २’ हा २०२२ वर्षातील कमी दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनानंतर अगदी काही दिवसांच्या कालावधीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘अवतार २’ सहाव्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्युरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम’ चित्रपटानेही १३ दिवसांत बॉक्स ऑफिसवर एक बिलियन डॉलरची कमाई केली होती.

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Govinda
३ दिवस ७५ लोकांच्या युनिटने गोविंदाची स्वित्झर्लंडमध्ये शूटिंगसाठी पाहिलेली वाट; प्रसिद्ध दिग्दर्शक खुलासा करत म्हणालेले, “३ दिवसानंतर…”
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर
Jessica Alba husband Cash Warren separation
२० वर्षांची साथ अन् ३ मुलं, प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याचा १६ वर्षांचा संसार मोडला?
Bigg Boss 18 Vivian Dsena for dragging Chum Darang during Ticket to Finale Task
Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”
pritish nandi died bollywood celebrities pays tribute
प्रसिद्ध निर्माते प्रीतीश नंदी यांचे निधन, करीना कपूरसह ‘या’ बॉलीवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली; संजय दत्त पोस्ट करत म्हणाला…

हेही वाचा>>“अशोक सराफ आजही…”, निवेदिता यांनी पतीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘अवतार २’ ने देशात प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आत्तापर्यंत या चित्रपटाने देशांतर्गत २६८ कोटींची कमाई केली आहे.  चित्रपटाचे भारतभर सर्वच शो हाऊसफुल होत आहेत.

हेही वाचा>> “तुनिषा शर्माचा खून…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा उल्लेख करत बॉलिवूड अभिनेत्रीचं ट्वीट

‘अवतार २’ हा चित्रपट अवतार चा दुसरा भाग आहे. २००९ मध्ये अवतार प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या भागासाठी चाहत्यांना तब्बल १३ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे आता ‘अवतार २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत.

Story img Loader