बॉलिवूडमध्ये सध्या जरी ‘ब्रह्मास्त्र’सारखे प्रयोग होत असले तरी सुपरहीरो किंवा फॅंटसी चित्रपटात हॉलिवूडचा हात धरता येणं कठीण आहे. जगाच्या एक पाऊल पुढे असणाऱ्या हॉलिवूड चित्रपटातील सुपरहिरोजबद्दल तिथल्याच एका लोकप्रिय दिग्दर्शकाने एक वक्तव्य केलं आहे जे सध्या चांगलंच चर्चेत आहे. ते दिग्दर्शक म्हणजे ‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’सारखे मास्टरपीस देणारे दिग्दर्शक जेम्स कॅमरून.

जेम्स कॅमरूनच्या ‘अवतार २’ची सगळीकडे चर्चा सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता आणि त्यालाही लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. २००९ साली प्रदर्शित झालेल्या अवतारच्या पहिल्या भागाची खूप चर्चा झाली, सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड हा तब्बल १० वर्षं ‘अवतार’च्या नावावर होता. नंतर २०१९ च्या ‘Avengers Endgame’ या चित्रपटाने तो रेकॉर्ड मोडला. याच डिसी आणि मार्वलच्या सुपरहीरोवर जेम्स कॅमरून यांनी टिप्पणी केली आहे.

आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीही केलं ‘कांतारा’चं कौतुक; म्हणाले, “माझ्या अंगावर…”

न्यू यॉर्क टाईम्सशी संवाद साधताना जेम्स कॅमरून यांनी सुपरहीरोवर टीका केली आहे. ते म्हणाले, “ज्या गोष्टी इतर लोकं करत नाहीत त्या मलाही करायला आवडतील. डिसी आणि मार्वल यांच्या भव्य चित्रपट बघताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, यातले सुपरहीरो वयाने कितीही मोठे असतो ते नेहमी कॉलेजमधील तरुणच वाटतात.”

शिवाय हे मोठे निर्माते ज्या दृष्टिकोनातून या चित्रपटाकडे बघतात ते मला पटत नाही. ‘अवतार’ आणि ‘टायटॅनिक’ या चित्रपटाबरोबरच जेम्स कॅमरून यांनी प्रसिद्ध सीरिज ‘टर्मिनेटर’च्या पहिल्या २ भागांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय १९८६ साली ‘एलियन्स’ हा सायन्स फिक्शन हा चित्रपटही जेम्स कॅमरून यांनी काढला होता जो प्रचंड हीट ठरला. ‘अवतार’चा दूसरा भाग यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे, शिवाय या चित्रपटाचे आणखीन ३ भाग येणार असल्याचीसुद्धा चर्चा आहे.

Story img Loader