गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. जगभरात या चित्रपटाने २.३२ बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १९ हजार कोटी रुपयांचे कमाई केली. ‘अवतार’चा पहिला भाग हा २००९ मध्ये आला होता, त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी हा सीक्वल प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासूनच्या याच्या पुढील भागांची चर्चा सुरू होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता ‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार ‘अवतार’चे पुढील भागांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘अवतार’ची टीम पुढील चित्रपटांच्या शेड्यूलमध्ये मोठे बदल करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. ‘अवतार ३’ हा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार होता, पण तो आता २०२५ मध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘अवतार ३’ १९ डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : “घरातील महत्त्वाचे निर्णय काजोल घेते का?” अजय देवगणने दिलं या प्रश्नाचं भन्नाट उत्तर

यानंतर तब्बल ४ वर्षांनी ‘अवतार ४’ प्रदर्शित होणार असून २०३१ मध्ये ‘अवतार ५’ प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. याचाच अर्थ ‘अवतार १’ प्रदर्शित झाल्याच्या बरोबर २२ वर्षांनी ‘अवतार ५’ हा या सीरिजमधील शेवटचा चित्रपट येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून आपल्याला या चित्रपटाच्या टीमची मेहनत लक्षात येते.

२००९ नंतर या चित्रपटाच्या पुढील भागांसाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’च्या प्रदर्शनाआधी जेम्स कॅमेरून यांनी चित्रपटाच्या सीक्वलवर भाष्य केलं होतं, जर हा चित्रपट हिट ठरला नाही तर याचे पुढील भागही येणार नाहीत, असा पवित्रा जेम्स यांनी घेतला होता, परंतु ‘अवतार २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ‘अवतार’चे हे दोन्ही भाग ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहायला मिळतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avatar next sequels got postponed when final film of avatar will get released avn