जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अवतारच्या पहिल्या भागाने बॉक्सऑफिसवर दणक्यात कमाई केली होती. अवतारह्या कमाईचा रेकॉर्ड तब्बल १० वर्षांनी मार्वेलच्या ‘एंडगेम’ या चित्रपटाने मोडला. एकूणच चित्रपटप्रेमी याच्या नवीन भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची सध्या चांगलीच चर्चा आहे.

गेल्या आठडवड्यातच या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. य चित्रपटाच्या पहिल्या भागाने भारतात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये २ लाख तिकीटांची विक्री केली होती आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७ कोटीचा गल्ला जमवला होता. आता या दुसऱ्या भागाचं बुकिंग अधिक दणक्यात सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”

आणखी वाचा : पुण्याच्या रस्त्यावर सँडविच विकायचा बॉलिवूडचा ‘ट्रॅजेडी किंग’; दिलीप कुमार यांचं होतं शहराशी खास नातं

‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार यावर्षी ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’चं ॲडव्हान्स बुकिंग यावेळी इतरही हॉलिवूड चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची आत्तापर्यंत ४.१० लाख तिकीटं विकली गेली आहेत, आणि पहिल्याच दिवशी हा चित्रपट १६ कोटी इतकी कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास या चित्रपटाला भारतात ५० कोटीचा टप्पा करायला जास्त वेळ लागणार नाही असं ट्रेड एक्स्पर्टचं मत आहे.

याआधी ‘स्पायडरमॅन – नो वे होम’ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ५ लाख तिकीटांची विक्री केली होती आणि ‘डॉक्टर स्ट्रेंज – मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटाची ३.८० लाख तिकीटं विकली गेली होती. ‘अवतार २’ ने येत्या काही दिवसात हा रेकॉर्ड मोडीत काढला तर हा एक वेगळा इतिहास रचणारा चित्रपट ठरेल. १६ डिसेंबर या दिवशी ‘अवतार २’ चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Story img Loader