हॉलिवूड सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचा अभिनय असलेल्या ‘अॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे सध्या सुरू असलेल्या ‘कॉमिक-कॉन’मध्ये अनावरण करण्यात आले. ‘मार्व्हल स्टुडिओ’च्या या सुपरहिरो चित्रपटात क्रिस हेम्सवर्थ, मार्क रफालो, क्रिस इव्हान आणि स्कारलेट जॉनसन इत्यादी कलाकारांच्या भूमिका आहेत. या नयनरम्य अनावरण सोहळ्यात संगीताच्या तालावर चित्रपटातील एक एक कलाकार मंचावर येत होता. सुरुवातीला डाऊनी मंचावर आला आणि त्याने प्रेक्षकांमध्ये गुलाबाची फुल फेकल्याचे, एका हॉलिवूड पत्रकाराने सांगितले. मंचावर उपस्थित चित्रपटातील अन्य स्टार मंडळींकडे पाहात तो म्हणाला, प्रत्येकवेळी माझे महत्व कमी होत चाललो आहे. त्यावर प्रेक्षकामधून “रॉबर्ट तू बेस्ट आहेस!” अशी आरोळी आली. यावर, कदाचित तू बरोबर असशील, असे तो मिश्किलपणे म्हणाला. दिग्दर्शक जॉस व्हेडॉन यांना दुखापत झाली असल्या कारणाने ते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी टि्वटरवर म्हटले आहे. ‘दी अव्हेंजर्स’च्या यशस्वी प्रदर्शनानंतर २०१२ च्या मेमध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. पुढच्यावर्षी १ मे ला हा चित्रपट उत्तर अमेरिकेत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा