अॅव्हेंजर्सचे दिग्दर्शक ज्यो रुसो हे ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम्’ च्या प्रमोशनसाठी भारतात आले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय चित्रपटांचं भरभरून कौतुक केलं. विशेष म्हणजे रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटापासून अॅव्हेंजर्समधलं एक दृश्य प्रेरित असल्याचंही त्यांनी कबुल केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी रोबोट पाहिला. अव्हेंजर्स ऐज ऑफ अल्ट्रॉनमधली एक दृश्य हे रजनीकांत यांच्या रोबोटपासून प्रेरणा घेऊन चित्रीत करण्यात आलं आहे’, असं ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. पण याचसोबत ज्यो यांनी सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटाचंही कौतुक केलं आहे. ‘दबंग’ चित्रपट मी पाहिला, मला हा चित्रपट खूपच आवडला मात्र दबंग २ पाहण्याचं राहून गेलं अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

‘अॅव्हेंजर्स: एंडगेम्’ हा चित्रपट २६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. भारतात माव्‍‌र्हल सुपरहिरोपटांचा मोठा चाहता वर्ग आहे. या वर्गाला खूश करण्यासाठी दिग्दर्शक ज्यो रुसो मुंबईत आले आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ज्यो यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासोबत काम करण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. मार्व्हलच्या आगामी प्रोजेक्टमध्ये प्रियांकाची वर्णी लागू शकते  असंही ते म्हणाले. प्रियांकासोबत बोलणं सुरु आहे वेळ आल्यावर यासंबधी घोषणा केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avengers age of ultron inspired by rajinikanths film robot