मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सचा सर्वात मोठा चित्रपट Avengers Endgame येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, थॉर आणि हल्क यासारख्या तब्बल ३२ सुपरहिरोंनी भरलेल्या या सुपरहिरोपटाची चाहते अक्षरशः डोळ्यात तेल घालून वाट पाहात आहेत. या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस आणखी वाढवण्यासाठी मार्व्हल युनिव्हर्सतर्फे यांतील प्रत्येक सुपरहिरोबाबत रोज काही ना काही पोस्ट केले जाते. अशीच एक पोस्ट Avengers Endgame मध्ये सुपरहिरो हल्कची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मार्क रफेलोने केली आहे. त्याने भारतीय चाहत्यांना खुश करण्यासाठी गणपती व वैष्णो देवीचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंखाली त्याने भारतीय देवतांचे महत्त्व सांगणारा मजकूरही लिहिला आहे.

हल्क हा इतर सुपरहिरोंच्या तुलनेने अधिक आक्रमक सुपरहिरो आहे. त्याला येणारा राग हेच त्याचे शस्त्र आहे. परंतु अनेकदा रागाच्या भरात हल्कला नि:शस्त्र लोकांवरही हल्ला करताना आपण पाहिले आहे. यावर उपाय म्हणून आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हल्क चित्रपटामध्ये योगा व ध्यानधारणा करताना दिसतो.

 

View this post on Instagram

 

#navaratri #ninenightsofdevi #motherdivine #madurga #grace #celebratingmother

A post shared by Betty Jones (@gurubetty) on

 

मोठ्या पडद्यावर हल्क रुपात तोडफोड करणारा मार्क रफेलो खऱ्या आयुष्यातही तसाच आक्रमक आहे. त्याच्या मते भारतीय देवतांच्या सानिध्यात त्याला शांतता लाभते व त्याला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. हा शांततामय अनुभव सुपरहिरो चाहत्यांनीही घ्यावा यासाठी त्याने त्याचे प्रेरणास्त्रोत असलेल्या भारतीय देवतांचे फोटो पोस्ट केले आहेत.