मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सचा सर्वात मोठा चित्रपट Avengers Endgame येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. आर्यन मॅन, कॅप्टन अमेरिका, थॉर आणि हल्क यासारख्या तब्बल ३२ सुपरहिरोंनी भरलेल्या या सुपरहिरोपटाची चाहते अक्षरशः डोळ्यात तेल घालून वाट पाहात आहेत. याची प्रचिती चित्रपटाच्या तिकीट विक्री दरम्यान आली आहे.
फँडांगो आणि अॅटम या ऑनलाईन तिकीट विक्री करणाऱ्या जगातील दोन अव्वल वेबसाईट मानल्या जातात. या संकेतस्थळांनी २६ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या अव्हेंजर्स: एंडगेमची अगाऊ तिकीट विक्री सुरु केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विक्रीची माहिती मिळताच चाहते या दोन संकेतस्थळांवर अशरक्ष: तुटून पडले. जगभरातील लाखो चाहते एकाच वेळी या संकेतस्थळांवर आल्यामुळे त्यांचे सर्वर डाऊन झाले. परिणामी फँडांगो आणि अॅटम ही दोन्ही संकेतस्थळे क्रॅश झाली. विशेष म्हणजे एका तिकीटाची किंमत तब्बल ५०० डॉलर म्हणजेच सहा हजार रूपये आहे.
याआधी स्टार वॉर्स फ्रेंचाईजीच्या स्टार वॉर्स: द फोर्स अवेकेंन्स आणि स्टार वॉर्स: द लास्ट जेडी या दोन चित्रपटांच्या प्रि बुकींग तिकीट विक्री दरम्यान वेबसाईट क्रॅश झाली होती. त्यावेळी त्या चित्रपटांच्या एका तिकीटीची किंमत केवळ १५० डॉलर होती. मात्र मार्व्हल चाहत्यांमुळे हा विक्रम आता तुटला आहे. Avengers Endgame च्या एका तिकीटाची किंमत ५०० अमेरिकन डॉलर आहे. हा सुपरहिरोपट येत्या २५ एप्रिलला अमेरिकेत व २६ एप्रिलला भारतात प्रदर्शित होणार आहे.