छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. ती सध्या बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. याच शोमध्ये स्नेहाचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता अविष्कार दार्वेकरही स्पर्धक म्हणून सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. आता बिग बॉसच्या घरात नेहा आणि अविष्कारमध्ये मैत्री झाल्याचे पाहायला मिळते.
कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरेखा कुडची अविष्कारला एकटं वाटून घेऊ नकोस. आपण सर्व एकत्र आहोत असे बोलताना दिसत आहेत. त्यावर विशाल स्नेहा बसलेली असते तिकडे इशारा करत एकदा तिकडे बघ असं म्हणतो. त्यानंतर अविष्कारला रडू कोसळते आणि तो स्नेहाला मिठी मारतो. सध्या बिग बॉसच्या घरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : १९व्या वर्षी पहिलं लग्न तर आठ महिन्यात दुसऱ्यापतीसोबत काडीमोड; जाणून घ्या कोण आहे स्नेहा वाघ
स्नेहाने वयाच्या १९व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१५मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहानाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१८मध्ये स्नेहाने एका मुलाखतीमध्ये बोलत असताना तिच्या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नांचा खुलासा करत त्यामागचे कारणदेखील सांगितले होते.