काही महिन्यांपूर्वी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पाकिस्तानी क्रिकेटपटू पती शोएब मलिक यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. दोघंही लवकरच कायदेशिररित्या विभक्त होणार असल्याचा दावा शोएबच्या एका जवळच्या नातेवाईकाने केला होता. या दोघांच्या घटस्फोटाला पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर कारणीभूत असल्याचंही म्हटलं गेलं. पण, या सर्व प्रकरणात सानिया व शोएब मात्र अद्यापही मौन बाळगून आहेत. अशातच आयशा उमरने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

साजिद खान Bigg Boss 16 मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? नाव वाचून व्हाल चकित

सानिया व शोएबच्या कथित घटस्फोटाला आयशा जबाबदार असल्याच्या खूप चर्चा झाल्या, त्यावर तिने मौन सोडलं आहे. अलीकडेच आयशाने शोएब अख्तरने होस्ट केलेल्या एका चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी शोएब मलिकबरोबरच्या कथित अफेअरबद्दल तिला विचारण्यात आल्यावर आयशाने तिचं स्पष्ट मत नोंदवलं. “मी कधीही विवाहित किंवा कमिटेड पुरुषाकडे आकर्षित होणार नाही. प्रत्येकजण मला ओळखतो आणि हे मी सांगण्याची गरज नाही,” असं आयशा म्हणाली.

Video: भर कार्यक्रमात हिंदी बोलताना अडखळली न्यासा देवगण; अहमदनगरमधील व्हिडीओ व्हायरल

आयशाने शोएब मलिकबरोबर फोटोशूट केल्यानंतर या अफवांना उधाण आलं होतं. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली की ‘अफवा आधी सीमेपलीकडून पसरवल्या गेल्या आणि नंतर तिच्याच देशातील मीडियाने उचलून धरल्या.’

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या खूप चर्चा झाल्या. पण दोघांनी कोणत्याही प्रतिक्रिया दिल्या नाही. याच चर्चांदरम्यान, या दोघांनी मिर्झा मलिक शोची घोषणा केली होती.

Story img Loader