‘वॉण्टेड’ चित्रपटामध्ये सलमान खानसोबत लक्षवेधी भूमिका साकारणारी आणि आपल्या सौंदर्याने तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी आएशा टाकिया पुनरागमन करतेय. ‘जिंदगी ये जिंदगी’ या म्युझिक व्हिडिओमधून ती बऱ्याच वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आएशाने त्याचा फर्स्ट लूकसुद्धा शेअर केलाय. हा म्युझिक व्हिडिओ लवली सिंग यांनी दिग्दर्शित केला असून मुरली अग्रवाल हे निर्माते आहेत. आएशा आणि लवली सिंग यांनी २००७ मध्ये ‘क्या लव्ह स्टोरी है’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या म्युझिक व्हिडिओबद्दल सांगताना लवली सिंग म्हणतात की, ‘हा म्युझिक व्हिडिओ एका चित्रपट सारखाच आहे. या गाण्यात एक कथा आहे. महिला सशक्तीकरणाबाबत यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या बहिणीची मानवी तस्करीतून सुटका करणाऱ्या स्त्रीची कहाणी त्यात मांडली आहे.’

Mubarakan Poster : ‘करतार सिंग तुमची मनं जिंकायला येतोय’ 

फेब्रुवारीमध्ये आएशा टाकियाच्या एका फोटोबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. या फोटोमधील आएशाचा बदललेला चेहरा पाहून तिने ओठांची सर्जरी केल्याचं अनेकांनी म्हटलं आणि त्यासाठी सोशल मीडियावर तिची अनेकांनी खिल्लीदेखील उडवली. सोशल मीडियावरुन उमटणाऱ्या उलट सुलट प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आएशानेदेखील सोशल मीडियाचा आधार घेतला. ‘सध्या आपण कसे दिसतो त्याचा अभिमान बाळगायला हवा, सध्याच्या बदलत्या जगात मला प्रश्न विचारण्याचा कुणालाही अधिकार नाही’, असे सांगत तिने नेटीझन्सला सडेतोड उत्तर दिले. ‘मी स्वत:वर प्रेम करते, तुम्हीही स्वत:वर प्रेम करा’, असा सल्ला देत आएशाने सौंदर्याची खिल्ली उडविणाऱ्यांचा समाचार घेतला.