बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि आयुष शर्मचा ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा सिनेमा नुकताच रिलिज झाला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता आयुष शर्माने कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कपिलने आयुष्यसोबत धमाल केली आहे. तसचं आयुषने देखील त्याच्या लग्नातील एक धमाल किस्सा यावेळी शोमध्ये शेअर केला.

2014 सालामध्ये आयुषने सलमान खानची लाडकी बहीण अर्पितासोबत लग्नगाठ बांधली आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये आयुष शर्माने त्याच्यासोबत लग्नात घडलेला एक किस्सा शेअर केला ज्यामुळे लाजेने त्याची मान खाली गेली होती. लग्नाच्या वरातीत आयुष घोडीवर बसून निघाला होता. यावेळी अर्पिता त्याला सतत मेसेज करत होती. ती तयार नसल्याने थोडं आरामात आणि हळू येणास ती सांगत होती असं आयुषने सांगितलं.

अमिताभ बच्चन यांचा रॅपर अंदाज, बादशहासोबत करणार धमाल

पुढे आयुषने तो मजेदार किस्सा सांगितला. ” जसं आम्ही पोहचलो तेव्हा आमिर खान माझ्या जवळ आले आणि म्हणाले मी तुला घोडीवरून खाली उतरवतो. ते मला खाली उतरवायला आले मात्र त्याच वेळी माझी सलवार अडकली आणि मी थेट आमिरच्या अंगावरच पडलो. ते बिचारे मला हाय म्हणायला आले होते आणि मी त्यांच्या अंगावरच पडलो. त्यानंतर मी स्वत:च्या लग्नातच माझा चेहरा लपवत राहिलो. त्यांना माझा चेहरा पाहून हा मुलगा अंगावर पडला हे आठवू नये म्हणून” असं सांगत आयुषने त्याच्या लग्नातील किस्सा शेअर केला.

सलमान खानची बहीण असल्याने अर्पिता आणि आयुषच्या लग्नात बॉलिवूडसह अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. २०१४ सालामध्ये दोघांचं लग्न झालं होतं. आयुष आणि अर्पिताला आहिल आणि आयत ही दोन मुलं आहेत.

Story img Loader