बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा हा लवयात्री या चित्रपटानंतर आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आर्यन आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत ‘अंतिम :द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसणार आहे. लवयात्री चित्रपटातून आयुषला सलमानने लॉन्च केले. तर अंतिममध्ये सलमानसोबत मुख्य भूमिकेत दिसला. दरम्यान, एका मुलाखतीत आयुष त्याच्या लिंकअप विषयी बोलला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषला प्रश्न विचारला की ‘ग्लॅमरच्या या जगात कधी कोणाचं नाव कोणाशी लिंकअप होतं आणि बऱ्याच अफवा या सर्रास सुरु असतात, तर त्याच्यापासून लांब राहण्यासाठी कोणत्या गोष्टी करतोस?’ यावर उत्तर देत आयुष बोलतो, “मला तर नेहमी वाटतं की माझ्या लिंकअपच्या खोट्या बातम्या आल्या पाहिजे, कोणीही माझ्या विषयी असं काही लिहत नाही. कोणी लिहिलं तर निदान घरी तरी मला महत्त्व मिळेल.”

आणखी वाचा : KBC 13 : उंच आहात तर घरातील पंखे तुम्ही साफ करता का? एका लहान मुलाने विचारलेल्या प्रश्नाचे बिग बींनी दिले भन्नाट उत्तर

आणखी वाचा : माझे पणजोबा स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळेच मला…; कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल

पुढे आयुष म्हणाला, “मला वाटतं, मी कोणतं पाप केलं आहे की, ज्यामुळे माझ्या विषयी अशा अफवा येत नाही. मला अर्पिताने खूप मारलं तरी चालेल, मला वाटतं की बायकोचं लक्ष माझ्याकडे गेलं पाहिजे. माझ्या लिंकअपच्या अफवा सुरु झाल्या, तर घरातलं वातावरण ही मजेशीर असेल. मी आणि अर्पिता आधी मित्र आहोत मग पती-पत्नी. मी तिला अनेकदा सांगतो की माझं लिंकअप कोणाशी झालं पाहिजे, तर ती बोलते, अशा व्यक्तीसोबत जिच्यावर मला अभिमान असेल. त्यामुळे आमच्यात असे विनोद सुरुच असतात.”

Story img Loader