पुलवामा आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. शहिदांसाठी संपूर्ण बॉलिवूडनं श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडचा अभिनेता, गायक आयुषमान खुराना यानंही शहिदांना काव्यरुपी श्रद्धांजली वाहिली आहे.
‘देश का हर जवान बहुत ख़ास है,
है लड़ता जब तक श्वास है,
परिवारों के सुखों का कारावास है,
शहीदों की माओं का अनंत उपवास है,
उनके बच्चों को कहते सुना है –
पापा अभी भी हमारे पास हैं!’
अशा हृदयस्पर्शी शब्दात आयुषमाननं शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांचं खडतर आयुष्यही आयुषमाननं आपल्या कवितेतून मांडलं आहे. आयुषमानची काव्यरुपी श्रद्धांजली अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेली आहे.
सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २, ५४७ जवानांना ७० वाहानांतून नेले जात होते. १४ फेब्रुवारीला सीआरपीएफचा ताफा अवंतीपुराला पोहोचताच आत्मघातकी वाहन ताफ्याला धडकले. या हल्ल्यात ७६ व्या बटालियन वाहानाच्या चिंधड्या उडाल्या आणि अन्य वाहानांचीही मोठी हानी झाली. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली. बॉलिवूडच्या कलाकारांनी ट्विटच्या माध्यमातून या भ्याड आत्मघातकी हल्ल्याचा निषेध केला आहे.
देश का हर जवान बहुत ख़ास है,
है लड़ता जब तक श्वास है,
परिवारों के सुखों का कारावास है,
शहीदों की माओं का अनंत उपवास है,
उनके बच्चों को कहते सुना है –
पापा अभी भी हमारे पास हैं!-आयुष्मान #Pulwama
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) February 16, 2019
अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खानसारख्या कलाकारांनी पुढे येऊन शहीदांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक निधीही गोळा केला आहे. ‘टोटल धमाल’, ‘उरी’ चित्रपटाच्या टीममधल्या कलाकारांनीही शहीदांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक निधी गोळा केला आहे.