अभिनेता आयुष्मान खुराना याने वैविध्यपूर्ण चित्रपटांमध्ये आपल्या बहारदार अभिनय करत प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्यापैकी त्याचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट आणि त्याने साकारलेली ‘पूजा’ खूप गाजली. हिच पूजा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरून आपल्या भेटीला येणार आहे. आयुषमानने आज या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली.

हेही वाचा : ‘आरआरआर’ चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पुढे, ‘या’ दोन विभागांत नामांकन मिळण्याची शक्यता

Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स
ankita prabhu walavalkar Pushpa 2 review
“प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. आता आयुष्मान ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येत आहे. या चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे. ‘ड्रीम गर्ल’ मधील आयुष्मान खुरानाची भूमिका त्याच्या इतर चित्रपटांतील भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. त्यात अन्नू कपूर, अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंग आणि नुसरत भरुचा यांनीही आपल्या अभिनयाने चित्रपटात बहार आणली.

आता ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. ‘ड्रीम गर्ल २’मध्ये नुसरत भरूचाच्या ऐवजी अभिनेत्री अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान आणि अनन्या पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

आयुष्मानने एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यात ‘ड्रीम गर्ल 2’मध्ये कोणकोणते कलाकार असणार आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाहीर केले आहे. या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे ‘ड्रीम गर्ल २’ २०२३ च्या ईदला, म्हणजेच पुढील वर्षी २९ जूनला प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : Photos : ट्रेनमध्ये गाणं गाणारा सामान्य मुलगा ते बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता…जाणून घ्या आयुष्मानच्या प्रवासाबद्दल

तर अनन्या आणि आयुष्मानव्यतिरिक्त ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर, राजपाल यादव, विजय राझ, मनोज जोशी, सीमा पावा आणि मनजोत सिंगदेखील पुन्हा एकदा त्याच भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला होता. त्यामुळे तिच सगळी स्टारकास्ट त्याच भूमिकांमध्ये परत दिसणार असल्याने प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. राज शांडिल्य या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तर एकता कपूर त्याची निर्मिती करत आहे.

Story img Loader