बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आयुषमानचा अनेक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आयुषमानने अंडर कव्हर एजंटची भूमिका साकारली आहे. सध्या आयुषमान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान त्यानं एक मोठा खुलासा केला की, त्यानं पत्नी ताहिरा कश्यपचं (Tahira Kashyap) प्रसिद्ध पुस्तक ‘द 7 सिन्स ऑफ बिइंग अ मदर’ वाचलेलं नाही. याच पुस्तकात ताहिरांन तिच्या आयुषमानसोबतच्या आपल्या सेक्स लाइफ विषयी मोठे खुलासे केले आहेत.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा आयुषमानला विचारलं गेलं की,’ एक वाचक आणि पती म्हणून तुझ्या पत्नीचं ‘द 7 सिन्स ऑफ बिइंग अ मदर’ हे पुस्तक तुला कसं वाटलं?’ यावर उत्तर देत आयुषमान म्हणाला, “वाचक म्हणू नक्कीच हे पुस्तक वाचण्यासारखं आहे असं मी म्हणेन. पण खरं सांगायचं तर मला स्वतःच्या पर्सनल गोष्टी लोकांसोबत शेअर करायला आवडत नाहीत. माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणं आवडत नाही. आणि आम्ही दोघं याबाबतीत खूप वेगळे आहोत. अनेकांसाठी माझ्या पत्नीचं पुस्तक एंटरटेनिंग असेल कदाचित, पण मी ते अजून वाचलेलं नाही.”
आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…
आणखी वाचा : “मी झोपडपट्टीत वाढलोय…”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचे वक्तव्य चर्चेत
पुढे “तहिरानं तुमचे बैडरुम सीक्रेट्स सगळ्यांसमोर मांडले तेव्हा तुला कसं वाटलं?” असा प्रश्न विचारता आयुषमान म्हणाला, “मला माहित नाही हे. तिच्या मनात जे येतं ते ती बोलून दाखवते, करते, पण मी तसा माणूस नाही.”
आणखी वाचा : ऐश्वर्याला खोटी अंगठी देत अभिषेकने केले होते प्रपोज, अभिनेत्याने सांगितले होते या मागचे कारण
ताहिराने तिच्या ‘द 7 सिन्स ऑफ बिइंग अ मदर’ या पुस्तकात खुलासा केला आहे की, आपल्या मुलासाठी पम्प केलेलं ब्रेस्ट मिल्क आयुषमान प्यायला होता. यासोबत पुस्तकाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, “मुलं झाल्यानंतर ती आयुषमानसोबत हनिमूनला गेली होती, पण तो हनिमून यशस्वी ठरला नाही”.
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
ताहिरा कश्यप आणि आयुषमाननं २००८ मध्ये लग्न केलं होतं. दोघे शाळेपासून मित्र होते आणि मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. आयुषमान आणि ताहिरा आता दोन मुलांचे आई-बाबा आहेत. वरुष्का आणि विराजवीर अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. शिल्पा शेट्टीच्या शो मध्ये काही दिवसांपूर्वी ताहिरा कश्यपने हजेरी लावली होती. तेव्हा तिनं आपल्या सेक्स लाईफविषयी उघडपणे भाष्य केलं होतं. ताहिरानं म्हटलं होतं, “सेक्स वर्कआऊटचाच एक भाग आहे. छोट्याशा वेळात देखील तो आपली कॅलरी बर्न करायला मदत करतो”. असं ताहिरा म्हणाली होती.