अभिनेता आयुष्यमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप हे बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. ताहिरा कश्यप ही एक उत्तम लेखक आहे. ती आयुष्यमानची पत्नी असली तरी या दोघांमध्ये पती-पत्नीच्या पलिकडे मैत्रीचं नातं असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. ताहिरा नेहमीच बिनधास्तपणे तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसते. अलिकडेच शिल्पा शेट्टीचा शो ‘शेप ऑफ यू’मध्ये तिने हजेरी लावली होती आणि या शोमध्ये तिनं तिच्या सेक्स लाइफबद्दल काही खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर ताहिरानं स्वतःचा फिटनेस कसा सांभाळला हे या मुलाखतीत सांगितलं. यासोबतच पती आयुष्यानाच्या प्रवासातून प्रेरित होऊन तिनं या शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. ज्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. स्वतःच्या सेक्स लाइफबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या ती बरीच चर्चेत आहे. ‘काही किलो कॅलरी बर्न करण्यासाठी सेक्स हा चांगला व्यायाम ठरू शकतो.’ असं वक्तव्य तिनं या मुलाखतीत केलं आहे.

ताहिरा म्हणाली, ‘आमच्या संदर्भात बोलायचं तर जरा जास्तच कॅलरी बर्न होतात. हे सेक्स आहे आणि हे चांगलं आहे. तर मग ते आपण का करू नये.’ एवढं बोलून ताहिरा जोरजोरात हसू लागली. स्टार कलाकाराची पत्नी असण्याच्या दबावावरही ताहिरानं या मुलाखतीत भाष्य केलं. ती म्हणाली, ‘अर्थात मागच्या दशकात हा दबाव सर्वांवर निश्चितच वाढला आहे. मला कोणत्याही कार्यक्रमात उत्तम परफॉर्म करायचं आहे. पण माझ्याकडे तोडीस तोड मॅच नाही. पण आयुष्यमानची पत्नी म्हणून माझ्यावर कोणताही दबाव नाही.’

दरम्यान कामाबद्दल बोलायचं तर आयुष्यमान आगामी काळात २७ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘अनेक’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्यात तो एका अंडर कव्हर पोलीसाची भूमिका साकारत आहे. नाविन्यपूर्ण विषयावर काम करणाऱ्या आयुष्याननं अशाप्रकारची भूमिका याआधी साकारलेली नाही. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana wife tahira kashyap open about her sex life with husband at shilpa shetty show mrj