भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ आणि ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमास खुद्द अझरुद्दीन उपस्थित होता. त्याचप्रमाणे चित्रपटातील कलाकार इमरान हाश्मी, नर्गिस फाखरी, प्राची देसाई आणि लारा दत्ता हेदेखील उपस्थित होते. चित्रपटात इमरान हाश्मी अझरउद्दीनच्या मुख्य भूमिकेत, तर प्राची देसाई अझरची बायको नौरीनच्या भूमिकेत दिसेल. नर्गिस फाखरी संगिता बिजलानीची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. यावेळी निर्माता एकता कपूर आणि स्नेहा रजानी यांनी खास उपस्थिती लावली होती.
पाहा ‘अझर’ चित्रपटाचा ट्रेलर!
चित्रपट ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमास खुद्द अझरुद्दीन उपस्थित होता.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 04-04-2016 at 13:10 IST
TOPICSमोहम्मद अझरूद्दीन
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azhar movie trailer