बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी इटलीमध्ये लेक कोमामध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं. मोजक्या जवळच्या मैत्रमैत्रिणीच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. डेस्टीनेशन वेडिंगला प्राधान्य देणाऱ्या या जोडीप्रमाणेच बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत. ज्यांनी डेस्टीनेशन वेडिंगला प्राधान्य दिलं आहे. तर पाहुयात कोण आहेत हे सेलिब्रेटी.
१. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली – अभिनेत्री अनुष्का शर्माने डिसेंबर २०१७ मध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केलं. या दोघांनीही लग्नासाठी इटलीतील टस्कनीची निवड केली होती. पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये विरुष्काचे नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. त्यानंतर या दोघांनी मुंबईमध्ये परतल्यानंतर बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना रिसेप्शन पार्टी दिली होती.
२.राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा – राजा की आयेगी बारात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री राणी मुखर्जी बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. राणीने २०१४ मध्ये आदित्य चोपडासोबत लग्न केलं. या जोडप्याने देखील इटलीमध्ये लग्न केलं आहे.
३. ऋतिक रोशन आणि सुझान खान – ऋतिक रोशन आणि सुझान खान हे बॉलिवूडमधलं प्रसिद्ध जोडपं २०१६ मध्ये विभिक्त झालं. या जोडप्याने १७ वर्षांचा संसार मोडल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला होता. मात्र आता विभक्त झाल्यानंतरही ही जोडी चांगल्या मित्र-मैत्रिणी प्रमाणे वावरत आहेत. या जोडीने बंगळुरुमध्ये लग्नगाठ बांधली होती.
४. अर्पिता खान आणि आयुष शर्मा – बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खानने डेस्टिनेशन वेडिंगसाठी हैदराबादची निवड . हैदराबादमधील फलकनुमा पॅलेस येथे आर्पिताने २०१४ मध्ये आयुष शर्मासोबत लग्न केलं. बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी आर्पिता-आयुषच्या लग्नाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आयुषने नुकतंच लवयात्री या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र त्याच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला.
५. नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी सहाय – अभिनेता नील नितीन मुकेशने राजस्थानमध्ये ९ फेब्रुबारी २०१७ मध्ये रुक्मिणी सहायसोबत लग्नगाठ बांधली. बॉलिवूडपासून काही काळ लांब राहिलेला नील नितीन मुकेशला नुकतीच एक लहान मुलगी झाली असून नुरवी असं तिचं नाव आहे.
६. लारा दत्ता आणि महेश भूपति-
अभिनेत्री लारा दत्ताने टेनिसपटू महेश भूपतिसोबत लग्न केलं असून यांनी डेस्टिनेशन वेडिंगसाठी गोव्याची निवड केली होती.
७. कुणाल कपूर आणि नैना बच्चन – अभिनेता कुणाल कपूरने बच्चन परिवारामधील नैना बच्चनसोबत लग्न केलं आहे. या दोघांनी २०१५मध्ये सिशेल्स येथे लग्नगाठ बांधली.
८. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास – बॉलिवूड अभिनेत्री लवकरच अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधणार असून ती राजस्थानमधील उमेद भवन पॅलेस येथे लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.