श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित ‘बागी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरवर श्रद्धा आणि टायगर दोघेही हटके लूकमध्ये दिसत आहेत. टायगरचे सिक्स पॅक्स आणि पिळदार शरीरयष्टीही लक्ष वेधून घेणारी आहे. ‘बागी’ येत्या २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ या दोघांनी जिममध्ये बरीच मेहनत घेतली आहे. या पोस्टरला चांगलीच पसंती मिळत असून ते सध्या व्हायरल होत आहे. ‘बागी’ भरपूर अॅक्शन सिक्वेन्सनी भरलेला असल्याने टायगर श्रॉफ नव्या दमाचा अॅक्शन हिरो ठरू शकतो. टायगर ‘बागी’मध्ये एका विद्रोही व्यक्तीची भूमिका साकारत असून या चित्रपटात तो अनेक रुपांमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

Story img Loader