कथाकथनाची शैली, व्हीएफएक्स आणि कलाकारांचा दमदार अभिनय या जोरावर एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजले. तेलुगू, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट पाहिला गेला. पण हिंदी भाषेतील ‘बाहुबली’मधील प्रभासला कोणी आवाज दिला हे तुम्हाला माहीत आहे का?
‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही हिंदी चित्रपटांसाठी मराठी अभिनेता शरद केळकर याने प्रभाससाठी आवाज दिला. याची चर्चा आता होण्यामागचं कारण म्हणजे प्रभास आणि शरदची पहिली भेट. प्रभास नुकताच काही कामानिमित्त मुंबईला आला होता आणि मुंबईत त्याने अभिनेता शरद केळकरची भेट घेतली. प्रभाससोबतचा सेल्फी शरदने सोशल मीडियावर शेअर केला. ‘चेहरा आणि आवाज..एकाच फ्रेममध्ये’ असा कॅप्शन शरदने या फोटोला दिला आहे.
The face and the voice … finally in one frame .. im honoured thankyou #Prabhas @BaahubaliMovie @ssrajamouli @karanjohar pic.twitter.com/wku3avr6rT
— Sharad Kelkar (@SharadK7) December 8, 2018
Kedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या ‘धडक’ला मागे टाकण्यात सारा अपयशी
‘बाहुबली’च्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफीसवर नवे विक्रम रचले. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली होती. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ च्या यशानंतर आता लवकरच माहेश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांच्यावर आधारित सिरिजसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे.