सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बार बार देखो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रर्दशित झाला आहे. फर्स्ट लुकच्या या पोस्टरवर सिद्दार्थ आणि कतरिनाची जोडी दिसत आहे. यामध्ये सिद्दार्थ आणि कतरिनाची केमेस्ट्री उत्तमप्रकारे रंगलेली दिसत आहे. एकुणच दोघांची जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. पहिल्या चित्रात सिद्धार्थ आणि कतरिना हसताना दिसत आहे तर दुस-या चित्रात कतरिनाने चष्मा घातलेला दिसून येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बार बार देखो’ हा एक रोमँटिक चित्रपट असून नित्या मेहराने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ग्लासगो, स्कॉटलंड, बँकाँकआणि दिल्ली येथे चित्रित करण्यात आला आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baar baar dekho first look sidharth malhotra katrina kaif look nice together