सध्या सिनेसृष्टीत ‘बार बार देखो’ या सिनेमाबद्दल चांगलीच चर्चा सुरू आहे. यात आता भर पडली आहे ती कतरिनाच्या बिकनी फोटोची. साधारणपणे सिनेमाचा ट्रेलर रिलिझ होतो आणि मग त्याची गाणी हळूहळू येऊ लागतात. पण बार बार देखोने मात्र याउलट जात, काला चष्मा हे गाणं सिनेमाचा ट्रेलर रिलिझ होण्याआधीच प्रदर्शित केले. सध्या त्या गाण्याला तरुणाईकडून चांगलीच पसंती मिळत आहे.  या सिनेमाशी निगडीत अजून एक फोटो सोशल साईटवर प्रसिद्ध झाला आहे.
यात कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रासोबत बिकिनीमध्ये दिसत आहे. सोशल साईट्सपासून लांब राहणारी कतरिना जेव्हा फेसबूकवर आली तेव्हा तिच्या चाहत्यांच्या आकड्यात झपाट्याने वाढ झाली. नुकताच तिने तिच्या फेसबूक अकाऊन्टवर हा हॉट फोटो शेअर केला. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेन्ट्सची बरसातच केली.
करण जोहर, फरहान अख्तर, रितेश सिदवानी, सुनिल लुल्ला यांसारख्या नामवंतांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नित्या मेहरा करत आहे.‘बार बार देखो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नित्या मेहेरा हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. रोमॅंटिक ड्रामा असणाऱ्या या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे सिनेरसिकांना एका नव्या जोडीची ‘ऑनस्क्रिन केमिस्ट्री’ पाहायला मिळणार आहे.